परभणी: राज्यात कोरोना रुग्ण संख्यांची वाढता आकडा त्यातच बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, इजेक्शन यांचा तुटवडा भासत आहे. जिंतुर येथे लसीकरणाचे नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे बुधवारी रुग्णालयात जेष्ट नागरिक, युवकांनी लस घेण्यासाठी एकच गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून फक्त १५० जणांना लसीकरण करण्यात आले, तर बाकी शेकडो नागरिक,व्रद्ध,महिला लसीकरणा अभावी परत गेले.
जिंतूरात शहरातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये बुधवारी कोविशील्डच्या १५० व कोव्हक्सीनच्या ५० लस उपलब्ध झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद होते. त्यामुळे शेकडो जणांना लसींचा दुसरा डोस घेण्याचा राहिलेला आहे. शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यु आकडा याचा मुळे लस ही कोरोना प्रतिबंधक आहे तरी जिंतुर मधील नियोजन आभावी नागरिकांना लस पासुन वंचित होत आहे.
दरम्यान बुधवारी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी पाचशेजण आले असता पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी स्वतंत्ररित्या डोस देण्याची व्यवस्था नसल्यामुळे लसीचे कमा डोस असल्यामुळे लससाठी लाभाथ्र्यामध्ये रेटारेटी सुरु झाली. हा प्रकार पाहून वैद्यकीय अधीक्षक डॉ़. रविकिरण चांडगे यांनी पोलिसांनाही पाचारण केले, या सर्व गोंधळामुळे वृध्द महिला,पुरुषांनी रांगेतून बाहेर जाणे पंसत केले यामुळे लसीकरण मोहिमेचे नियोजन नसल्याने काही नागरिक तसेच घरी परतले त्यामुळे गोंधळात आणखीन भर पडला.
महत्वाच्या बातम्या
- जिल्हांतर्गत तसेच जिल्ह्याबाहेरही एसटी सुरु राहतील, पण…; परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
- बीड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या धास्तीने बाजारपेठांत गर्दी; संचारबंदीचा नियम धाब्यावर
- शेतकरी कुटुंबातून आलेल्या अभिमन्यू काळेंची बदली अतिशय चुकीची; शिवसेना नेत्याचा घरचा आहेर
- गयावया करा, उधार घ्या किंवा डाका टाका पण ऑक्सिजनचा पुरवठा करा; उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
- ‘नानाजी, हवे तर प्रियांका गांधी यांचा सल्ला घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा हो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
