Share

मेल्ट्रॉन कोविड सेंटरमधून घाटीत नेतांना ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू..? प्रशासनाचा इन्कार

Published On: 

औरंगाबाद : महापालिकेच्या मेल्ट्रोन कोविड सेंटरमधून घाटी रुग्णालयात नेताना एका रुग्णाचा ऑक्सिजन अभावी तडफडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात प्रशासनातर्फे लपवाछपवी केल्याचा आरोपही होत आहे. मात्र प्रशासनाने रुग्णालयामुळे मृत्यू झालेला नाही असा खुलासा केला आहे.

शहरातील कोरोना बाधित नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये साडेतीनशे रूग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी सध्या तीनशेपेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. गंभीर रुग्णांसाठी या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था आहे पण अधिक प्रमाणात ऑक्सिजनची गरज असणाऱ्या गंभीर रुग्णांना घाटी रुग्णालयात रेफर केले जाते.

मंगळवारी एका रुग्णाची प्रकृती गंभीर झाली. ऑक्सिजनची मात्रा वाढविण्याची गरज असल्याने व त्या प्रमाणात मेल्ट्रॉमध्ये ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने रुग्णाचा घाटीत नेतांना काही मिनीटात मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात लपवाछपवी केली जात असल्याचा आरोप होत आहे.

त्यावर महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की एका रुग्णाची काल प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे त्याला घाटी रुग्णालयात पाठवले जात होते. रस्त्यात त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला. दरम्यान मेल्ट्रॉन प्रमुख वैशाली मुदगडकर यांनी देखील याठिकाणी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचा दावा केला आहे.

मेल्ट्रोन मध्ये रुग्ण गंभीर झाल्यानंतर त्यांना घाटी किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्याचे प्रकार वाढले आहेत इतर ठिकाणी हलवताना अनेक रुग्ण घाबरत आहे. मात्र प्रशासनातर्फे मेल्ट्रोन मध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्यास खपवून घेतले जाणार नाही, तर बाहेर पडल्यानंतर काही घडले तर आपला तिला त्याच्याशी संबंध नाही. असे फर्मान येथील डॉक्टरांना वरिष्ठांकडून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!