🕒 1 min read
मुंबई : राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची टंचाई निर्माण झाली असून त्याला अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे हे जबाबदार असल्याने सरकारच्या वतीने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. मात्र, ठाकरे सरकारने केलेल्या या बदलीला शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विरोध केलाय. पक्षाचेच नेते राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करत असल्याने त्यावर भाजपच्या वतीनेही टीका करण्यात आली आहे. राज्य सरकारला कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची गरज नाही तर वाजे सारख्या वसुली अधिकाऱ्यांची गरज असल्याची टीका भाजप नेते नीलेश राणे यांनी केली आहे.
या संदर्भात नीलेश राणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘जितेंद्र आव्हाड यांना सांगा यावर उत्तर द्यायला. मुजोर अधिकारी म्हणून ज्यांची बदली केली त्या अधिकाऱ्याच्या मागे जाहीर पाठिंबा शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची गरज नाही आहे तर वाजे सारख्या वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज ठाकरे सरकारला आहे.’
जितेंद्र आव्हाड यांना सांगा यावर उत्तर द्यायला. मुजोर अधिकारी म्हणून ज्यांची बदली केली त्या अधिकाऱ्याच्या मागे जाहीर पाठिंबा शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची गरज नाही आहे तर वाजे सारख्या वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज ठाकरे सरकारला आहे. pic.twitter.com/JPNj6ROSc4
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 22, 2021
वास्तविक भाजपच्या वतीने रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपनीसोबत मध्यस्थी करुन ५० हजार इंजेक्शन खरेदीचा प्रयत्न करण्यात आला होता. यात भाजपला परवानगी देण्याचे काम काळे यांनी केले होते. त्यातच काळे यांनी एका मंत्र्याने फोन केल्यावरही इंजेक्शन उपलब्ध करुन दिले नाही. त्यामुळे त्यांची बदली झाली असल्याचे बोलले जात आहे. या सर्वात या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळालय, त्यामुळे या पुढेही यात राजकारण सुरूच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हांतर्गत तसेच जिल्ह्याबाहेरही एसटी सुरु राहतील, पण…; परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
- पराभवासह केकेआरने केली चेन्नईच्या संघाची ‘या’ नकोशा विक्रमात बरोबरी
- शेतकरी कुटुंबातून आलेल्या अभिमन्यू काळेंची बदली अतिशय चुकीची; शिवसेना नेत्याचा घरचा आहेर
- गयावया करा, उधार घ्या किंवा डाका टाका पण ऑक्सिजनचा पुरवठा करा; उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
- ‘नानाजी, हवे तर प्रियांका गांधी यांचा सल्ला घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा हो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
