Share

दम मारो दम! शहरात ४७ किलो कॅनबीस जप्त, नाका बंदीवर फक्त विचारपूस ?

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शासनाने कडक निर्बंध लावले आहे. त्याची अंमलबजावणी पोलिस देखिल करत आहे. शहरात तब्बल ६० जागी नाका बंदी करण्यात आली, असताना देखील शहरात ४७ किलो कॅनबीस वनस्पती (गांजा) पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे शहरात नाका बंदीवर फक्त विचारपूस होत आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

पोलिस आयुक्त डॉ निखिल गुप्ता यांनी माहिती मिळाली की, सिल्लेरु ओडिसा येथून चिकलठाणा मार्गे शहरातील नारेगाव परिसरात तीन जन कॅनबीस वनस्पती विक्रीसाठी आणणार असल्याचे समजले. ही माहिती त्यांनी विशेष पथकाचे सपोनि राहुल रोडे यांना देत, कारवाई करण्याचा सूचना दिल्या.

त्यानुसार कॅम्ब्रिज मार्गे चिकलठाणा दिशेने सांगितलेल्या वर्णाचे तिघे जण दुचाकी आणि कार जात असल्याचे रोडे यांच्या निदर्शनास आले. आधीच सापळा लावून बसलेल्या पथकाला त्यांनी कारवाईची सूचना दिली. यात त्यांनी विजय संजय ठाकरे, वय २५, रा. धुळे, आवेज खान मेहमूद खान वय २७, रा. मोमीनपुरा, लोटाकारंजा, महंमद इद्रिस महंमद इसा वय ३५, रा. गरमपाणी या तिघांना अटक केली.

त्यांच्या कडून ४७ किलो कॅनबीस वनस्पती (गांजा) जप्त करण्यात आला. तसेच एक दुचाकी आणि एक कारहि जप्त करण्यात आली आहे. त्यांच्या वर एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहे. मात्र, सध्या नाका बंदी वर वाहन धारकांना फक्त कोठे चालला इतकी विचारपूस करण्यात येत आहे. परंतु विशेष पथकाच्या प्रयत्नाने शहरात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!