मुंबई : मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात गंभीर आरोपांची माळ लावली आहे. मानसिक आणि शारीरिक छळासह, पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप संजीवनी यांनी केला आहे. त्यानंतर खुद्द संजीवनी काळेंनी पाठवलेला एक व्हिडीओ भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत संजीवनी काळे यांनी पोलिसांनी आपल्यावर सेटलमेंटसाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. ‘त्यावरुन हे काय चाललंय राज्यात?’ असा सवाल चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना विचारला आहे.
तसेच त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात त्या म्हणाल्या की, ‘ गजाजन काळेवर सकाळी एफआयआर दाखल करण्यात आली . मला मुख्यमंत्र्यांना सांगायचे आहे की, हे काय घडतयं नक्की राज्यात. मुख्यमंत्री साहेब याकडे थोडं लक्ष घाला. आता घरात देखील महिलांवर अन्याय होतं आहेत. हे कधीपर्य़ंत असचं सुरु राहणार? त्यांना न्याय द्यायचं सोडुन सेटलमेंट करणार का आता?’ असे सवाल चित्रा वाघ मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना केले आहे.
मा. @DGPMaharashtra
गजानन काळे वर गुन्हा नोंद होऊनही @Navimumpolice कार्यवाही का करत नाहीत कुठल्या अधिकारात पिडीतेला सेटलमेंट करण्यास सांगताहेत ??
अटक का नाही झाली तर पोलिस म्हणतात फरार आहे पण सेटलमेंट करण्यासाठी आरोपीला हजर करायला नवी मुंबई पोलिस तयार आहेत
हे कसं काय ?? pic.twitter.com/bv4QZX1eAT— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 14, 2021
दरम्यान, मानसिक आणि शारिरीक छळवणूक करणे या आणि अशा आदी कलमांखाली काळे यांच्या पत्नीकडून नेरुळ पोलिस ठाण्यात गजानन काळेयांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या काही वर्षापासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असल्याचंही त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे. तसंच त्यांचे अनेक स्त्रियांशी संबंध असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘डरायचं नाही तर फक्त लढायचं!’, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा निर्धार
- ‘डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या सूत्रधारांचे काय झाले?’, अंनिसचा सरकारला सवाल
- आश्चर्यम! राऊतांकडून राज्यपालांचे कौतूक; म्हणाले, ‘ते प्रेमळ, सद्वर्तनी, मनमिळावू, पण..’
- भाजपाचे चाणक्य लागले कामाला, एका बाणातून साधणार दोन निशाणे
- बंदी असतानाही गोपीचंद पडळकरांकडून २० ऑगस्टला बैलगाडा-छकडा शर्यतीचे आयोजन


