औरंगाबाद : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी, कोरोना लसीने आशादायी चित्र निर्माण केले आहे. मात्र आता कोरोना लसींचा साठा संपण्यातच जमा असल्याचे समजते. महापालिकेने शासनाकडे लसींचा पुरवठा करण्यासाठी मागणी केली आहे. मात्र अजूनपर्यंत शहराचा लस मिळालेल्या नाहीत. सध्या पालिकेकडे दिड हजार लसींचा साठा शिल्लक असल्याचे समजते.
कोरोना संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात व्यस्त असलेल्या महापालिकेचा कोरोना लसींचा साठाही आता संपला आहे. दोन दिवसांपूर्वीच एक पथक लसींचा साठा आणण्यासाठी रवाना झाले आहे. मात्र अद्यापही साठा मिळाला नसल्याने पथक आलेले नाही. उद्या शुक्रवार सकाळपर्यंत दहा हजार लसींचा साठा मिळणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार औरंगाबाद शहरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. आजवर सुमारे ८६ हजार नागरिकांना पालिकेने ३७ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून लस दिली आहे. शासनाकडून महापालिकेला लस पुरविली जाते. पालिकेच्या माध्यमातून विविध आरोग्य केंद्र व दवाखान्यांतून नागरिकांना लस दिली जाते. मात्र मागील दोन दिवसांपासून पालिकेत लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.
पालिकेने शासनाकडे लसीची मागणी नोंदवली आहे. मात्र शासनाकडून अद्याप लस उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. त्यामुळे आहे तोच लसीचा साठा पुरवून पुरवून वापरला जात आहे. बुधवारी पालिकेकडे ३,५०० लसींचाच साठा शिल्लक होता. त्यातील दीड ते दोन हजार लसींचा वापर गुरुवारी करण्यात आला. त्यामुळे केवळ दीड हजार लस सध्या शिल्लक आहेत. शासनाकडून दहा हजार लसींचा साठा मिळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लॉकडाऊन‘ मध्येही विद्यापीठाच्या परीक्षा होणार
- चारशे वर्षांच्या इतिहासावर कोरोनामुळे गदा! २० मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार नाथ सोहळा
- ऋषभ पंत ४३६ दिवसांनी वनडे खेळला अन् इंग्रजांना पळता भुई थोडी…
- मांजरा धरणाचा कालवा फुटला; लाखो लिटर पाणी गेले वाया
- खुप गरजेचे काम असेल तरच बाहेर पडावे, पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या सुचना


