मुंबई : कार्डिलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणापासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) तसेच समीर यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर(Kranti Redkar) हे दोघेही चांगलेच चर्चेत आले आहेत. दरम्यान, आता या दाम्पत्याने थेट गुगल,ट्विटर आणि फेसबुकलाच न्यायालयात खेचले आहे.
यावेळी समीर यांनी सोशल मीडियातील प्रसिद्ध प्लॅटफॉर्म असणारे गुगल(Google),ट्विटर(Twitter) आणि फेसबुक(Facebook) यांच्यावर निशाणा साधला असून सोशल मिडियाच्या माध्यमातून वानखडे कुटुंबियांवर खालच्या पातळीत भाष्य करणाऱ्या किंवा बदनामी करणाऱ्या पोस्ट गुगल, ट्विटर आणि फेसबुकने थांबवाव्यात आणि फक्त एवढेच नाही तर त्या काढून टाकाव्यात असे आदेश न्यायालयाने द्यावेत,अशी विनंती वानखेडे दाम्पत्याने न्यायालयात केली आहे.
दरम्यान, समीर वानखेडे यांचे वकिल रोहन जनार्दन यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आतापर्यंत दोन सुनावण्या झाल्या असून न्यायालयाने अद्याप कोणतेही आदेश पारित केलेेले नाहीत. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ डिसेंबर रोजी दिंडोशी कोर्टात होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- जंगलपहाडातला योद्धा शेवटी जंगलातच कोसळला- संजय राऊत
- तुमचे खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडून आलेत; शंभुराज देसाईंचा चंद्रकांत पाटलांना टोला
- आपल्या हक्कांबरोबरच इतरांच्या हक्कांबद्दलही जागरूक राहणे महत्वाचे-अमोल कोल्हे
- बिपीन रावत यांच्यासह इतरांवर आज अंत्यसंस्कार; पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
- मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी मानवी हक्कांचे रक्षण आवश्यक- शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

