मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी त्यांच्या असभ्य भाषेतल्या टीकेमुळे गुन्हा देखील दाखल केला होता. तसेच संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना देखील असभ्य भाषेचा वापर केला त्यामुळे भाजप नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली.
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वकतव्यांमुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते करत आहेत. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले, संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना स्वत:चा गुरु म्हणवून घेऊ नये. संजय राऊत सध्या ज्याप्रकारची वक्तव्यं करत आहेत, ते पाहता त्यांच्या जिभेवर संशोधन करावे लागेल, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
पुढे बोलताना नितेश राणे यांनी संजय राऊत यांना थेट ओपन चॅलेंज दिले आहे. नितेश राणे म्हणाले, संजय राऊत यांच्या जिभेला हाड असेल आणि त्यांच्यामध्ये खरंच हिंमत असेल तर एकदा त्यांनी स्वत:भोवतालच्या पोलिसांच्या गराड्यातून बाहेर येऊन दाखवावं. मग जीभ कशी चालवायची हे भाजपचे कार्यकर्ते त्यांना बरोबर दाखवतील, असे नितेश राणे म्हणाले आहेत. आता यावर संजय राऊत काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘योगीजी, या निरागस चिमुकलीच्या किंकाळ्या तुम्हाला झोप कशी येऊ देतात?’
- केंद्रीय गृहमंत्र्यांनी वाहिली रावत दाम्पत्याला श्रद्धांजली
- माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी ऑनलाइन फसवणुकीचा बळी; ‘ती’ चूक पडली महागात
- प्रदर्शनापूर्वीच ’83’ चित्रपट अडकला वादाच्या भोवऱ्यात; जाणून घ्या कारण
- महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी; कुटुंबातील सर्वांना संपवण्याचा पत्रातून इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

