Share

अभिनेत्री अथिया शेट्टी वापरते ‘या’ क्रिकेटपटूचे कपडे! ; फोटो व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. तिचा भाऊ अहान शेट्टीच्या (Ahan Shetty) तडप चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये ती तिच्या बॉयफ्रेंड आणि क्रिकेटपटू के एल राहुलच्या (Cricketer KL Rahul) हुडीमध्ये दिसली. त्यानंतर दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले असून त्यावेळचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

दरम्यान अथियाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. यात तिने काळ्या रंगाचा प्रिंट असलेला एक टीशर्ट परिधान केला होता. तर काही दिवसांपूर्वी त्यासारख्याच रंगाचा प्रिंट असलेला एक टीशर्ट तिचा बॉयफ्रेंड के एल राहुलने परिधान केला होता. यामुळे या दोघांच्याही फोटोखाली ‘सेम टीशर्ट’ अशी कमेंट अनेक नेटकरी करताना दिसत आहे. यामुळे बॉयफ्रेंड आणि क्रिकेटपटू के एल राहुलचे कपडे परिधान करते का असा सवाल चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारत आहेत.

https://www.instagram.com/p/CVrznw4BB6y/?utm_source=ig_web_copy_link

इतकच नव्हे तर काही दिवसांपूर्वी त्या दोघांनी सेम रंगाची हुडी परिधान केली होती. याचे फोटोही त्यांनी स्वत:च्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. विशेष म्हणजे या फोटोखाली क्रिकेटपटू मयांक अग्रवाल (Cricketer Mayank Agarwal ) याने कमेंट करत ‘ही हुडी कुठेतरी बघितल्यासारखी वाटतेय’, असे लिहिले आहे.

https://www.instagram.com/p/CXOIRB1h5o_/?utm_source=ig_web_copy_link

 

अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथियाने २०१५ बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने ‘हीरो’ चित्रपटात पहिल्यांदा काम केले. ती ‘मुबारक’ आणि ‘मोतीचूक चकनाचूर’ या चित्रपटांतही झळकली आहे. बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन क्षेत्रांचे नाते फार जवळचे आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटमधल्या बऱ्याच जोड्या आजवर चर्चेत राहिल्या आहेत. त्यातच आता अथिया व राहुल या जोडीची भर पडली आहे. त्यामुळे या फोटोंची प्रचंड चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!