🕒 1 min read
मुंबई : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी त्यांच्या असभ्य भाषेतल्या टीकेमुळे गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आशिष शेलार यांनी जामिनासाठी अर्ज केला आणि त्यांना जामीन देखील मंजूर करण्यात आला. यावर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाना साधला आहे.
याबाबत चंद्रकांत पाटील ट्विट करत म्हणाले, ‘भ्रष्टाचार, खंडणी, वसुली यापलिकडे महाविकास आघाडीचे कुठले कर्तृत्व नाही. आणि याविरुद्ध कुणी बोलले, तर त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविणे, यापलिकडे दुसरा उद्योग नाही. जनतेची सरकार म्हणून सेवा करणे, एवढे एक सोडून सारे काही सुरू आहे. संपूर्ण भाजपा आशिष शेलार यांच्या पाठीशी आहे!’ असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
भ्रष्टाचार, खंडणी, वसुली यापलिकडे महाविकास आघाडीचे कुठले कर्तृत्व नाही.
आणि याविरुद्ध कुणी बोलले, तर त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविणे, यापलिकडे दुसरा उद्योग नाही.
जनतेची सरकार म्हणून सेवा करणे, एवढे एक सोडून सारे काही सुरू आहे.
संपूर्ण भाजपा @ShelarAshish यांच्या पाठीशी आहे!— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 9, 2021
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकारांशी बोलताना देखील असभ्य भाषेचा वापर केला त्यामुळे भाजप नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर चांगलाच निशाणा साधत आहेत. त्यानंतर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांना आलेल्या पत्रात अत्यंत अश्लील भाषेचा वापर करण्यात आला होता त्याच सोबत महापौर आणि सगळ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे वाकड्या नजरेनं बघू नका, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे. त्यावर आता महापौर किशोरी पेडणेकर स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करणार असल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या
- संपूर्ण देश बिपिन रावत यांच्या निधनाने शोक व्यक्त करतंय, मात्र गुणरत्न सदावर्ते विचारतात…
- भारत लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी तयार- पंतप्रधान मोदी
- …म्हणून आयसीसीच्या तीन स्पर्धांमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला; रोहितचे मोठे वक्तव्य
- कतरिना-विकीवर शुभेच्छांचा वर्षाव; बॉलिवूड कलाकारांच्या हटके कमेंट्स चर्चेत
- ‘युपीत रामराज्य प्रस्थपित झाले, अभिनंदन योगीजी!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
