Share

…’शाहजादे’ राज्य करत आहेत; कोहलीच्या कर्णधार पदावरून राऊतांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकापूर्वीच भारतीय कर्णधार विराट कोहलीने (virat kohli) विश्वचषकानंतर टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र टी-20 विश्वचषकात संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर विराट कोहली वनडे कर्णधारपदही गमावणार हे जवळपास निश्चित झाले होते. त्यास बुधवारी मान्यताही देण्यात आली. बीसीसीआयने विराट कोहलीला भारताच्या वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवून रोहित शर्माकडे (rohit sharma) कर्णधारपद सोपवले.

भारतीय क्रिकेटमध्ये झालेल्या या बदलाबाबत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच बऱ्याच जणांनी आपले मत देखील मांडले आहे. दरम्यान आता या विषयावर राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. नितीन राऊत यांनी विराटला कॅप्टन पदावरून हटवण्याचा प्रसंग टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत मोहम्मद शमीवर झालेल्या टीकेशी जोडला आहे. त्या प्रकरणानंतरच विराटचे कर्णधारपद जाणार हे स्पष्ट होते, असा दावा नितीन राऊत यांनी केला आहे.

नितीन राऊत ट्विटमध्ये म्हणाले की, ‘पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर ज्या खंबीरपणे विराट कोहली महंमद शमीच्या पाठीशी उभा राहिला होता, तेव्हाच अंदाज यायला हवा होता की त्याचं कर्णधारपद जाणार. क्रिकेट नियामक मंडळात सध्या ‘शाहजादे’ राज्य करतायत ना! अशा आशयाचे ट्विट करत नितीन राऊत यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे.

काय होते  प्रकरण?

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवानंतर टीम इंडिया मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली होती. तर काही जणांनी भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीवर निशाणा साधला होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीने मॅच फिक्सिंग केल्याचे आरोप करण्यात आला होता.

यावेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली शमीच्या पाठीशी ठाम उभा होता. तसेच त्याने धर्म काढणाऱ्या ट्रोलर्सना सुनावले देखील होते. ‘खूप लोक सोशल मीडियावर आपली ओळख लपवतात आणि खेळाडूंना ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. हे खूप खालच्या पातळीचं आहे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असते, म्हणून हा ड्रामा केला जातो. खेळाडूचं समर्थन कसं करायचं ते आम्हाला माहिती आहे. सोशल मीडिया ट्रोलिंग आणि बाहेरच्या आवाजांचं आमच्यासाठी काहीही महत्त्व नाही,’ असं कोहली म्हणाला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!