मुंबई: बॉलिवूड मधील विनोदी अभिनेता म्हणून ओळख असणारा शेखर सुमनवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. नुकतेच शेखरच्या आईचे दु:खद निधन झाले आहे. शेखर सुमनने ट्विटरद्वारे आईच्या निधनाची माहिती दिली आहे.
ट्वीटमध्ये शेखर सुमनने लिहिले की, ‘माझ्या आईवर माझे सर्वात जास्त प्रेम होते. ती आम्हाला सोडून गेली. मला अनाथ आणि उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटत आहे. तुम्ही सर्वांनी केलेल्या मदतीसाठी तुमचे आभार’ असे शेखर सुमनने ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्याच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
My beloved♥Mother whom I loved the most in this world left for her heavenly abode yday.i feel orphaned and devastated.Thank you Ma for being there for all of us all the time.i will miss you till my last breath.
Thank you all for your prayers and blessings????— Shekhar Suman (@shekharsuman7) June 18, 2021
काही दिवसापूर्वी त्याने आईचा फोटो शेअर करत प्रकृती खालावली असल्याचे सांगितले होते. त्यानंतर चाहत्यांनी शेखर सुमनची आई लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली होती. यावर त्याने ट्वीट करत आई लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले होते. मात्र १७ जून रोजी शेखर सुमनच्या आईने अखेरचा श्वास घेतला. यामुळे अनेकांनी शेखरला आधार देत त्याच्या दुखत सहभागी झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “स्वबळाची भाषा राष्ट्रवादी करत नाही”, टोंपेंचे ‘स्वबळावर’ स्पष्टीकरण
- पडद्यावरील ‘मिल्खा सिंग’ फरहानने वाहिली श्रद्धांजली ; म्हणाला, विश्वास बसत नाहीये…
- मिल्खा सिंग यांचा वारसा सदैव सोबत राहील; अनिल कुंबळेंच्या भावना
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
- ‘आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो’ ; मोदींनी व्यक्त केल्या भावना


