Share

‘ढग साफ झाले आहेत’ ; फोटो शेअर करत मुंबई इंडियन्सने क्रिकेट प्रेमींना दिला दिलासा

Published On: 

इंग्लंड : अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे एकाही दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. क्रिकेटरसिकांसाठी असलेल्या या खास पर्वणीवर मात्र काल पावसाने पहिल्या दिवशी पाणी फेरले.

त्यामुळे आज स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता  (भारतीय प्रमाण वेळेनुसार ठीक 3 वाजता) खेळाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती आयसीसीकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर साउथहॅमप्टटनमधल्या ढगांचा फोटो करत, त्याला कॅप्शनही दिले आहे, कॅप्शन मध्ये लिहिले आहे  ‘ढग साफ झाले आहेत ज्या सामन्याची वाट पाहत आहोत त्याची होणार सुरुवात’

https://www.instagram.com/p/CQSdYBhqWtg/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, अंतिम सामन्याआधी साऊथॅम्प्टनचे हवामान खूपच खराब असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान अहवालानुसार 18 ते 22 जून दरम्यान साऊथॅम्प्टनमध्ये पावसाची शक्यता आहे. दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचा परिणाम अंतिम सामन्यावर होण्याची शक्यता आहे. आजचा सामना होणार की नाही याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!