🕒 1 min read
मुंबई : देशात कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. नुकतेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आर्थिक फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या एप्रिल-मे महिन्यात देशाच्या उत्पादकतेवर माेठा परिणाम झाला आहे. याचा तब्बल दाेन लाख काेटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने घेतलेल्या आढाव्यातून हे स्पष्ट झाले आहे.
दुसऱ्या लाटेमुळे सर्वच राज्यांमध्ये लाॅकडाऊन किंवा कठाेर निर्बंध लावण्यात आले हाेते. अनेक सोई बंद करण्यात आल्या. त्यामुळे देशांतर्गत मागणी घटली. त्याचा घरेलू उत्पादनावर माेठा परिणाम झाला. हे नुकसान सुमारे २ लाख काेटी रुपयांपर्यंत असल्याचा आरबीआयने अंदाज व्यक्त केला आहे.
बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी ‘स्टेट ऑफ इकाॅनाॅमी’ संदर्भात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, दुसऱ्या लाटेने लहान शहरे आणि ग्रामीण भागालाही विळखा घातला हाेता. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील मागणीवर विपरित परिणाम झाल्याचा उल्लेख या लेखात करण्यात आला आहे. केवळ लसीकरणाद्वारेच विषाणू नष्ट हाेणार नाही. आपल्याला विषाणूसाेबत जगणे शिकावे लागेल. याशिवाय संशाेधन आणि लाॅजिस्टीक्स या क्षेत्रात गुंतवणूकीमध्ये वाढ करावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
- औरंगाबादची चिंता वाढली, ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत पुन्हा वाढ
- आरटीपीसीआर टेस्ट ट्यूबमध्ये डास, हा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचा आरोग्य अधिकाऱ्यांचा दावा!
- अन् भुशी धरण ओव्हर फ्लो ; पण पर्यटकांना वर्षाविहार करण्यास मनाई
- पावसाने केला ‘गेम’; भारतीय संघ अजूनही करू शकतो ‘प्लेइंग ११’ मध्ये बदल ! घ्या जाणून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
