🕒 1 min read
नाशिक : महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर पायी वारीला परवानगी देण्यात आली नाही. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरित आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे.
मात्र, शेकडो वर्षांची परंपरा असलेली पायी वारी यंदा खंडित न करता काही निर्बंधांसह राज्य सरकारने पार पाडावी यासाठी भाजपसह काही वारकऱ्यांनी आग्रह धरला आहे. तसेच, जर पायी वारी झाली नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा होऊ देणार नाही असा आक्रमक इशारा देखील काही वारकरी संघटनांनी दिला आहे.
उध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता 'पवार'करी झाल्याने त्यांना 'वारकरी' कसा दिसणार ?
म्हणुनच तर वारी विषयी शिवसेनेने अद्याप चकार शब्द काढलेला नाही !@OfficeofUT @Dev_Fadnavis @ChDadaPatil @BJP4Maharashtra pic.twitter.com/HvqPL9N2ke— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) June 17, 2021
दरम्यान, याच मुद्द्यावरून भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले गेले कित्येक दिवस राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी महाविकास आघाडी सरकारसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांवर निशाणा साधला आहे. ‘उध्दव ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना आता ‘पवार’करी झाल्याने त्यांना ‘वारकरी’ कसा दिसणार ? म्हणुनच तर वारी विषयी शिवसेनेने अद्याप चकार शब्द काढलेला नाही !’ असा प्रहार आचार्य तुषार भोसले यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गहिनीनाथ गडाच्या पायी वारीला परवानगी द्या’, पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
- …आणि फडणवीस-ठाकरेंची राजभवनावरील भेट थोडक्यात हुकली !
- ‘शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार’, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- ‘झारीतील शुक्राचार्य नेमके कोण? मराठा समाजाच्या मागण्या का मान्य होत नाहीत?’
- ‘पदोन्नती आरक्षणावर महाराष्ट्र ढवळून काढणार’, ऊर्जामंत्री राऊत यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
