मुंबई : पदोन्नतीच्या आरक्षणावर २१ जून नंतर बोलणार असून या विषयावर महाराष्ट्र ढवळून काढणार, अशी माहिती देत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या प्रकरणी भविष्यात आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहे.
ओबीसी समाजाचे आरक्षण असो, की मराठा समाजाचे आरक्षण असो. आरक्षण हे ज्या कारणास्तव देशाच्या घटनेमध्ये नमूद करण्यात आलं, त्या कारणास्तव देत असताना हे आरक्षण थांबवून अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्यामुक्त जाती आणि बहुजन मागास समाजाला वेठीस धरणारे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत, असा सवाल डॉ राऊत यांनी केला. या शुक्राचार्यांचे पितळ उघडे केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. आरक्षणाबाबत एकंदरीत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र मराठवाडा जिल्ह्याचा दौरा करत असताना आढळून आल्याचे निरीक्षण डॉ.राऊत यांनी नोंदवले.
मराठा आरक्षणाला पूर्णपणे समर्थन
ठिकठिकाणी आरक्षण या विषयावर लोकं भेटून आम्हाला विचारू लागले. मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही पूर्णपणे समर्थन दिलं आहे. परंतु ते समर्थन करत असताना राज्य सरकार हे आरक्षण प्रश्नी अपयशी ठरतेय असे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय ते योग्य आहे असं मला वाटत नाही, असेही राऊत यांनी सांगितले.
२१ तारखेनंतर भूमिका स्पष्ट करणार
काँग्रेस पक्षाचे धोरण हे संविधानाच्या बाजूने व संविधानाला अनुसरून आहे. त्याच्यावर चर्चा झाली आणि त्या माध्यमातून आम्ही सरकारमध्ये सामील झालो. तिन्ही पक्षांचे सरकार स्थापन होत असताना किमान समान कार्यक्रम तयार झाला त्याचे जे निकष आहे. त्या अनुषंगाने न्याय मागणे आमचं काम आहे. सरकारच्या तिन्ही पक्षांच्या कोअर कमिटीत हा विषय ठेवला आहे. २१ तारखेपर्यंत आम्ही थांबून आहोत. त्यानंतर यावर स्पष्ट भूमिका घेतली जाईल.
महत्वाच्या बातम्या
- ‘अश्विन आणि जाडेजा या दोघांनाही खेळवावे’ : सुनील गावस्कर
- दोन आठवड्यात मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये उभा राहणार ऑक्सिजन प्लांट!
- जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक फ्रान्सची टोटल एनर्जीज कंपनी करणार मराठवाड्यात गुंतवणूक!
- दानवे म्हणाले, ‘संजय राऊत चावी दिल्यावर बोलतात’; आता राऊतांच सडेतोड प्रत्युत्तर !
- काळी, सफेद, पिवळ्या बुरशीनंतर आता ‘या’ राज्यात हिरव्या बुरशीचा रुग्ण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
