Share

…आणि फडणवीस-ठाकरेंची राजभवनावरील भेट थोडक्यात हुकली !

Published On: 

मुंबई : आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः राजभवनावर गेले होते. त्यांच्या सोबत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित होते. राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा दीड वर्ष संघर्ष सुरूच आहे. मात्र तरीही महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीचा वारसा जपत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले.

तर, मुख्यमंत्र्यांच्या आधी अवघी काही मिनिटे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शुभेच्छा देण्यासाठी राजभवनावर आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील काहीच क्षणांत तेथे दाखल होणार होते. त्यामुळे युती तुटल्यानंतर निर्माण झालेला दुरावा आणि कालच शिवसेना-भाजपच्या राड्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेला कमालीचा तणाव अशा स्थितीत ठाकरे-फडणवीस यांची भेट राजभवनातच होते की काय ? याचं कुतूहल निर्माण झालं होतं.

झालं असं की, देवेंद्र फडणवीस दुपारी 12 वाजेच्या सुमारास राजभवनावर पोहोचले आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा राज्यपालांना शुभेच्छा देण्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले होते. एकाबाजूला फडणवीस यांनी राज्यपालांना शुभेच्छा देऊन निरोप घेतला तर मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा राजभवनाबाहेर पोहोचतच होता.

दरम्यान, लगेच फडणवीस यांचा ताफा राजभवनातून बाहेर पडला आणि अवघ्या काही क्षणांत मुख्यमंत्र्यांचा ताफा गेटमधून आत आला. त्यामुळे फडणवीस बाहेर पडताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राजभवनात एंट्री झाली आणि अखेर राजभवनावर या नेत्यांची भेट मात्र होऊ शकली नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!