🕒 1 min read
मुंबई : नीरज चोप्राने टोकयो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावलं. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये नीरज चोप्राने ही गोल्डन कामगिरी केली. टोकयो ऑलिम्पिकमधलं हे भारताचं पहिलंच गोल्ड मेडल आहे. तसंच ऑलिम्पिक इतिहासातलं एथलिटिक्समधलं हे भारताचं पहिलंच गोल्ड मेडल ठरले आहे. त्याच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशभरातील लोक त्याचं कौतुक करत आहेत. बॉलीवूड मधून देखील त्याचं कौतुक केलं जात आहे.
दरम्यान, बॉलीवूड अभिनेता आर माधवनचा मुलगा नीरज चोप्रा सारखा दिसत असल्याच्या चर्चा होत आहेत. झाले असे कि, आर माधवनने मुलाच्या 16व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्याच्या एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तोच फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CS1IggullAP/?utm_source=ig_web_copy_link
आर माधवनच्या मुलाची तुलना गोल्डन बॉय नीरज चोप्रासोबत होत आहे. आर माधवनचा मुलगा हुबेहूब निरज चोप्रासारखा दिसत आहे… असं नेटकरी म्हणत आहेत. मुलाचा फोटो शेअर करत आर माधवनने त्याला एक छान असं कॅप्शन देखील दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- कुत्ते! ‘ना ये भौकते है, ना ये गुर्राते है….बस…’ विशाल भारद्वाजच्या मुलाचा पहिला चित्रपट
- ‘आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच, सरकारनं कितीही रोखलं तरी आम्ही थांबणार नाही’
- मोठा आंतरराष्ट्रीय विक्रम रचण्यापासून ‘रनमशीन’ विराट फक्त 63 धावा दूर
- रुपाली भोसलेचा हटके लुक सोशल मीडियावर चर्चेत
- ‘मला होणारा त्रास अजूनही थांबलेला नाही’ ; देवरेंनी प्रथमच कॅमेऱ्यासमोर मांडल्या व्यथा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
