🕒 1 min read
मुंबई: देशभरात इंधनदरवाढ, महागाई विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षाकडून याविरोधात सतत केंद्राला वेठीस धरले जात आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जलसंपादन मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाना साधला आहे.
देशभरात महागाई, इंधनवाढ याविरोधात जनता तीव्र संताप व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे भाजप नेते जनआशीर्वाद यात्रा काढत आहेत. मात्र जनआशीर्वाद यात्रेला लोक आशीर्वाद नाही तर शिव्याशाप देत आहेत. अशी टीका करत त्यांनी ही यात्रा केवळ पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादामुळे भाजपचे नेते काढत असल्याची टीका त्यांनी भाजप नेत्यांवर केली आहे.
इंधन दरवाढ, महागाईमुळे देशातील जनतेमध्ये केंद्र सरकारविरोधात तीव्र नाराजी आहे. तरीदेखील अनेक ठिकाणी भाजप जनआशीर्वाद यात्रा काढत आहे, मात्र लोक आशीर्वाद नाही तर शिव्याशाप देत आहेत. ही यात्रा केवळ पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादामुळे भाजपचे नेते काढत आहेत – ना. @Jayant_R_Patil pic.twitter.com/DKVwBBD3Xj
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 23, 2021
दरम्यान केंद्र सरकारने नुकतीच गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ केली आहे. सततची पेट्रोल,डीझेल , खाद्यतेल यांच्या दारात वाढ होत असल्याने केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून आंदोलनदेखील करण्यात आले आहे. आता त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुजारा किंवा रहाणेच्या जागी सुर्यकुमारला तिसऱ्या कसोटीत संधी द्यावी’,- फारुख इंजिनीयर
- गुन्हे मागे ; बैलगाडा मालकांनी जल्लोषात केला गृहमंत्री वळसे पाटलांचा सत्कार
- मोठी बातमी : मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण
- गंभीर! कोरोनाची तिसरी लाट; पुढील महिन्यात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवा’, निती आयोगाच्या सूचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
