सोलापूर : कोरोनाचा धोका अद्यापही टळला नाही. याच पार्श्वभूमीवर या वर्षीदेखील कोरोना सावट कायम असल्याने सर्व धर्मियांनी सण-उत्सव साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन केले जात आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक नियम पाळून, गोविंदांचे लसीकरण करून अटींसह दहीहंडी उत्सव साजरा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गोविंदा पथकांनी राज्य सरकारकडे केली होती.
दहीहंडीबाबत आज गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या निर्णयावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी भाष्य केले आहे. ‘पारंपारिक, कमी गर्दीच्या, कमी उंचीच्या दहीहंडीला परवानगी दिली पाहिजे, नाही दिली तर सरकारच्या विरोधात आंदोलन करणार’, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.
दहीहंडी उत्सव कोरोनाच्या कारणामुळे करू नका अशी सरकारची भूमिका आहे. पण, मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा दहीहंडीच्या विनवणीसाठीच फोन केला. दोन डोस झालेल्या आणि प्रमाणपत्र असलेल्या जास्त उंच नसलेला असा पारंपारिक पद्धतीने दहीहंडी उत्सव आम्हाला करू द्या, अशी मागणी केली असल्याचे आशिष शेलारांनी सांगितले आहे.
दरम्यान, आशिष शेलार हे २ दिवस सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजावर सडकून टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मला तुमच्या भांडणात पडायचं नाही, पण…; अण्णा हजारेंनी देवरेंना दिला ‘हा’ सल्ला
- ‘मला होणारा त्रास अजूनही थांबलेला नाही’ ; देवरेंनी प्रथमच कॅमेऱ्यासमोर मांडल्या व्यथा
- भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी ; हि गर्दी टाळली पाहिजे- आरोग्यमंत्री
- ‘लवकरच मोठे शतक येणार आहे’ विराटच्या आयसीसी क्रमवारीवर प्रशिक्षकाची प्रतिक्रिया
- ‘सुभाष जाधव या शेतकऱ्याचा मृत्यू टळला असता मात्र त्यासाठी मंत्रालयात कोणी मंत्री तर हवा’


