पुणे – राज्यात काल 3 हजार 827 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 24 हजार 331 झाली आहे. आतापर्यंत राज्यातले एकंदर 62 हजार 773 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 55 हजार 651 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात काल 142 रुग्णांचा मृत्यू झाला . त्यामुळे राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या 5 हजार 893 झाली आहे.
एका बाजूला वाढत्या रुग्णांची चिंता असताना दुसऱ्या बाजूला कोरेाना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून बंद ठेवलेले अनेक व्यवसाय सुरू झाले पण सलून अजून बंदच आहेत. त्यामुळे सलून दुकानदारांना पारंपरिक व्यवसाय सोडून आता मोल मजूरी करण्याची वेळ आली आहे.
आकाशवाणीने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना विषाणूमुळे अनेकांच्या रोजगार धंद्यावर गदा आली आहे. त्यामुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे. हातचं काम गेल्यानं अनेकांची उपासमार सुरु आहे. काही जिल्ह्यात सलून दुकानदारांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत कुटुंबाचा गाडा चालवण्याची मोठी कसरत आता सलून दुकानदारांना करावी लागत आहे.
वर्षानुवर्षाचा पारंपरिक व्यवसाय सोडून त्यांना आता रोजगारासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. काही लोकांनी शेतात मोलमजूरीचं काम स्विकारले आहे तर काहीजण विविध प्रकारच्या कारखान्यात काम मिळविण्यासाठी धडपडत आहेत.
दरम्यान, अश्या बिकट परिस्थितीत शासनाने यावर काही तरी तोडगा काढावा अशी मागणी आता विविध संघटनांनी तसेच काही राजकीय पक्षांनी केली आहे. अन्यथा सलून दुकानदारांना बेरोजगार भत्ता तरी द्यावा अशी मागणी आता पुढे येत आहे.
कोरानाचं संकट हाताळण्यात सपशेल अपयशी, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा : राणे
कोरोनाकाळातील विजबिले कमी करण्याची भाजपची मागणी
भाजपच्या ‘या’ दिग्गज नेत्याला झाला कोरोना, संपूर्ण मंत्रीमंडळावर होम क्वारंटाइन होण्याची वेळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

