नवी दिल्ली: जगातील कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव आता ओसरला आहे, परंतु जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केलेल्या एका नवीन अभ्यासातून असे समोर आले आहे की, ओमिक्रॉननंतर एक नवीन व्हेरियंट समोर येत आहे. संस्थेचा दावा आहे की हे डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरियंटचे मिश्रण हा नव्या व्हेरियंट असणार आहे. ओमिक्रॉन आणि डेल्टा मिळून नवीन व्हायरस तयार करत आहेत. संस्थेने या अभ्यासाविषयी सांगितले की, या नवीन कॉम्बिनेशन व्हायरसबद्दल आधीच भीती होती कारण ते दोन्ही खूप वेगाने पसरत आहेत.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणते की ओमिक्रॉन आणि डेल्टाचा रिकॉम्बिनंट व्हायरस पसरत आहेत. संस्थेच्या शास्त्रज्ञ मारिया व्हॅन कारखोव्ह यांनी ट्विट केले आहे की SARSCov2 चे ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरियंटचा एकत्रित प्रसार होत आहे. हा प्रसार जलद गतीने होऊ शकतो. आम्ही त्याचा अभ्यास करत आहोत आणि त्यावर चर्चाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मारियाने एका व्हायरोलॉजिस्टचे ट्विट रिट्विट केले. या ट्विटनुसार, डेल्टा-ओमिक्रॉनच्या मिश्रित विषाणूचे सबळ पुरावे मिळाले आहेत. ते असेही म्हणाले की फ्रान्समध्ये जानेवारी २०२२ पासून त्याचा प्रसार होत आहे. डेन्मार्क आणि नेदरलँडमध्येही हा विषाणू आढळून आला आहे. मात्र, हा विषाणू जीवघेणा असल्याचा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही, असे संस्थेने पत्रकार परिषदेत सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

