🕒 1 min read
मुंबई : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे कळते. यापूर्वी सोमवारी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांना देखील कोरानाचा संसर्ग झाला आहे.
वर्षा गायकवाड ट्विट करत म्हणाल्या, ‘मला काल संध्याकाळी कोरोनाचे सौम्य लक्षणे जाणवले त्यानंतर मी कोरोना चाचणी केल्यानंतर कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजले. लक्षणे तुलनेने सौम्य आहेत. मी ठीक आहे. सध्या प्रकृती व्यवस्थित असून सुरक्षेच्या कारणामुळं आयसोलेट करुन घेतलं. गेल्या काही दिवसांपासून मला जे भेटले त्यांनी खबरदारी घ्यावी, असे अवाहनही वर्षा गायकवाड यांनी केले आहे.’ असे ट्विट वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
I learned today that I tested positive for COVID-19 after first feeling symptoms yesterday evening. My symptoms are relatively mild. I'm fine and have isolated myself. Request those who met me the past few days to take precautions.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 28, 2021
दरम्यान, सोमवारी काँग्रेस नेते आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांना देखील कोरोना ससंर्ग झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर ते देखील आयसोलेट झाले होते. काल के. सी. पाडवी आणि आज वर्षा गायकवाड यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मंत्रीमंडळात एकच खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भारत आणि सनातन संस्कृती या दोघांच्याही आत्म्याला दुखावण्याचा जो प्रयत्न करेल त्याला…’
- रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल; राष्ट्र्वादीचा इशारा
- रोहिणी खडसे हल्ल्याचा मुद्दा विधानसभेत मांडणार- चंद्रकांत पाटील
- ‘…यामुळे सापसुद्धा चावतो ही आधीच माहीत असलेली गोष्ट नव्याने समजली’
- ‘संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना?’, रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
