Share

‘आता इंडियाच मोस्ट वॉण्टेडचा पार्ट 2’ ; नवाब मलिकांनी केली अर्णब गोस्वामीवर जहरी टीका

Published On: 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरण महाराष्ट्र सरकारवर सतत निशाणा साधल्यानंतर रिपब्लिक टीव्हीसह अन्य काही वाहिन्यांचा टीआरपी स्कॅमसमोर आला आणि अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली.

आता आणखी एका प्रकरणावरून आज त्यांना अचानक अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असून पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आपलं जीवन संपवलं होतं.

अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी निशाणा साधला आहे. “काही काळापूर्वी इंडियाज मोस्ट वॉण्टेड नावाचा शो होता आणि अँकर गूढ मृत्यूवर भाष्य करत असे. पण याच अँकरला त्याच्या पत्नीच्या मृत्यूप्रकरणी अटक केली होती. आता इंडियाच मोस्ट वॉण्टेडचा पार्ट 2 आहे. दुसरा अँकर तेच करतोय, अर्णब गोस्वामीला अटक,” असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

काय आहे हे प्रकरण?

अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आपण हे पाऊल उचलत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी मृत्युपुर्वीच्या पात्रातून केला होता. मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्याने पोलिसांची दीड तास हुज्जत घातली. त्यामुळे पनवेल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अर्णब गोस्वामी याला अलिबाग न्यायालयात हजर केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!