🕒 1 min read
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवर भाजप नेते किरीट सोमय्या भ्रष्टाचाराचे आरोप करताना दिसत आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेमध्ये तब्बल ५०० ते ७०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारे पत्र किरीट सोमय्या यांना पाठवले होते. तसेच ‘आता हा घोटाळा उघड करा’, असे आव्हान राऊतांनी पत्राद्वारे दिले आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये ७०० कोटींचा घोटाळा झाला आहे. पण कुणी दखल घ्यायला तयार नाही. एकच व्यक्ती भ्रष्टाचाराच्या नावाने ओरडतेय, दुसरं काही महाराष्ट्रात होत नाही. भ्रष्टाचाराच्या विरोधात सगळ्यांनी लढाई केली पाहिजे. जे लढतात त्यांच्याकडे आणखी काही प्रकरण पाठवावीत असे मला वाटते. मी हे प्रकरण ईडीकडे देईन. यापूर्वीच्या सरकारमधील अनेक लोकांचा सहभाग या घोटाळ्यात आहे, असे आरोप राऊत यांनी केला आहे.
sent following letter to 'Scam crusader'@kiritsomaiya.it gives details of misappropriation of Funds to the tune of 500 cr Rs in the smart city project run by Pimpari chinchwad corporation ruled by BJP.Hope he will use his influence on ED to start the investigation.@NirajGunde pic.twitter.com/sPiSKSjGTH
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 20, 2021
पिंपरी-चिंचवडमध्ये ५०० ते ७०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा राऊतांनी केला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत हा घोटाळा झाला. ईडी, सीबीआय चौकशीसाठी सोमय्यांनी पुढाकार घ्यावा. तसेच, पत्रातील माहितीच्या आधारे सोमय्या ईडीकडे घोटाळ्याच्या चौकशीसाठी पाठपुरवा करतील, अशी अपेक्षा आहे. सर्वच ठिकाणचे घोटोळे उघड करणारे व्यक्ती म्हणून तुम्ही तुमची ओळख निर्माण केली आहे. सरकारी पैसा आणि मालमत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी तुम्ही कष्ट घेतले. खरं तर, अनेक सरकारी कर्मचारी आणि राजकीय नेत्यांना तुम्ही त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरण उघड केल्यानंतर तुरुंगात जावे लागले आहे, असेही राऊतांनी पत्रात सोमय्यांना उद्देशून म्हंटल आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- … म्हणून चिखलीच्या नगराध्यक्षांसह पतीची भाजपातून करण्यात आली हकालपट्टी
- याला राज्य सरकारच दोषी; रावसाहेब दानवेंनी कोळसा टंचाईचं फोडलं खापर ठाकरे सरकारवर
- ‘…हे कुठले डॉन आहेत का?’; जास्मिन वानखेडेंवरील आरोपानंतर मनसे आक्रमक
- ‘आज हमारी तो कल तुम्हारी बारी’; ईडी कारवाईवरुन विजय वडेट्टीवारांचे चंद्रकांत पाटलांना उत्तर
- ‘तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! आहे ते फक्त हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
