सिल्लोड : चिंचवन येथील वारसा वृक्षाच्या प्रतीक्षेत असलेल्या ३५० वर्ष पुरातन व २ एकर क्षेत्र असलेल्या व अस्ताला जाणाऱ्या विशाल वडास वाचविण्यासाठी अभिनव प्रतिष्ठान, अशोक गरुड शैक्षणिक व सामाजिक समूह , निसर्ग मित्र मंडळ, चिंचवन ग्रामस्थ यांच्या वतीने वड वृक्ष रोपणाचे शतक पार पडले. याबाबत ऐकल्यानंतर सिल्लोड येथील सलून व्यावसायिक असलेले पंडित बोर्डे त्यांच्या १० वर्षीय मुलगी मयुरी बोर्डेला ही बातमी समजली. आणि या चिमुकलीने चिंचवन येथे वाढदिवसाच्या निमित्ताने वर्षभर खाऊसाठी जमवलेल्या पैशातून झाडांना जाळी लावण्याचे ठरवले.
हि रक्कम त्यांनी कामात योगदान देणाऱ्या अभिनव प्रतिष्ठान या संस्थेकडे देण्याचे ठरवले. संस्थेचे डॉ. संतोष पाटील यांना फोन करून ही माहिती दिली. त्यांनी या मुलीची त्यांच्या दुकानात जाऊन भेट घेऊन मुलीकडून हरित भेट स्विकारली. संस्थेचे अध्यक्ष किरण पवार यांची संकल्पना असलेला ‘माझा वाढदिवस पर्यावरणासाठी’ हा उपक्रम आता शहरात रुजू लागला आहे.
सिल्लोड तालुक्यातील अनेकांनी आत्तापर्यंत या अभिनव चळवळीत सहभागी होत आपला वाढदिवस साजरा केला आहे. यातून एक वेगळेच समाधान मिळत असल्याचे सहभागींनी सांगितले. यावेळी प्रतिष्ठित नागरिक नामदेव सोनवणे, निकम आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे ज्ञानदीप प्राथमिक शाळेची विद्यार्थ्यांनी कॅन्सरग्रस्त महिलांना विग बनवण्यासाठी आपले केस दान केले होते. समाजातील सर्व घटकांनी या कामी पुढे यावे असे आवाहन जि. प.सदस्य अशोक गरुड व किरण पवार यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पैशाच्या वादातून महिलेसह चार जणांनी केले युवकाचे अपहरण
- कोवॅक्सिन केवळ दोनच केंद्रांवर मिळणार, पहिला डोस नाहीच!
- कडक निर्बंधांची चाहूल लागताच चोरट्यांनी दोन दुकाने फोडले, ड्रायफ्रुट-किराणा सामान लंपास
- कॉंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी हीच कॉंग्रेसमधील युवा कार्यकर्त्यांची इच्छा ?
- केंद्राचा मोठा निर्णय ; कोरोना बाधित क्षेत्रासाठी १.१ लाख कोटींची मदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

