Share

पैशाच्या वादातून महिलेसह चार जणांनी केले युवकाचे अपहरण

Published On: 

औरंंगाबाद : पैसे देवाण-घेवाणीच्या वादातून एका महिलेसह चार जणांनी विजय संजय गवई (वय २८,रा.प्रकाशनगर,मुकुंदवाडी) या युवकाचे आपहरण केले. ही घटना २६ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

विजय गवई आणि आरोपी महिलेमध्ये गेल्या काही दिवसापासून पैसे देवाण-घेवाणीच्या कारणावरून वाद सुरू होता. या वादातूनच आरोपी महिलेने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने विजय गवई याचे मुकुंदवाडी परिसरातून अपहरण केले. सायंकाळी उशिरापर्यंत विजय गवई घरी न परतल्याने विजय गवई याच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून त्याचे अपहरण करणाऱ्या महिलेसह चार जणांविरूध्द मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत महिलेसह चार जणांना पकडण्यासाठी तपासाची चक्रे फिरविण्यास सुरुवात केली असून विजयला सुखरूप आणण्यासाठी पोलीस योजना अखत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस तपास करीत आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!