औरंगाबाद : कोवॅक्सिन चा दुसरा डोस राहिलेल्या व्यक्तींची संख्या बरीच कमी असून त्यामुळेच आता शहरात महापालिकेच्या केवळ दोन केंद्रांमध्येच कोवॅक्सिन लस मिळण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच एखाद दुसऱ्या आठवड्यात उर्वरित व्यक्तींचा दुसरा डोसदेखील पूर्ण होऊ शकतो अशी शक्यता आहे.
देशभरात अजूनही कोवॅक्सिन व कोवीशिल्ड या दोनच लसी प्रत्यक्ष उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात तर राज्यातील केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये कोवॅक्सिन लस उपलब्ध करण्यात आली होती. मधल्या काळात अल्पकाळासाठी अगदी मोजक्या खाजगी केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये पहिला पहिल्यापासून लसीचा डोस दिले जात आहे.
दरम्यान अत्यल्प पुरवठ्यामुळे खाजगी लसीकरण खंडित झाले. कमी केंद्रांमुळे आरोग्य कर्मचारी व कर्मचाऱ्यांसाठी दुसरा डोस अप्रत्यक्षपणे राखुन ठेवण्यात आला. कमी पुरवठा असल्यामुळे घाटीचे केंद्र हे काही दिवस बंद करण्यात आले होते. एकंदर परिस्थितीमुळे कोवॅक्सिन पहिला डोस घेतलेल्या सामान्य नागरिकांचा दुसरा डोसचा प्रश्न उभा राहिला आहे.
त्या अनुषंगाने पालिकेने मोजक्या तीन केंद्रांवर नागरिकांसाठी कोवॅक्सिनचा दुसरा डोस दिला जात आहे. तरी सद्यस्थितीत कोवॅक्सिनचा दुसरा डोस राहीलेल्यांची संख्या सुमारे एक हजारांहून जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालिकेच्या राज नगर, क्रांती चौक याचठिकाणी कोवॅक्सिन उपलब्ध करुन देण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- आमचे देशमुख तर तुमचे दरेकर; भाजप नेत्यांच्या मागेही लागणार चौकशीचा ससेमिरा ?
- मंगळवारपासून मार्केट सायंकाळी चारला बंद! जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीआधी माजी खासदार चंद्रकांत खैरेंची घोषणा
- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर ‘या’ कारणामुळे भडकला सुमित राघवन
- रिझर्व्ह बँकेचा नेत्यांना दणका; नागरी बँकांच्या संचालकपदावर लोकप्रतिनिधींना बंदी
- ‘लढवय्ये नेते फडणवीसांची गरज आहे, संन्यास घेऊ देणार नाही’, संजय राऊतांनी केले कौतूक


