औरंंगाबाद : शहर परिसरात चोरट्यांनी धुमाकुळ घालण्यास सुरूवात केली असून कडक निर्बंधांची चाहूल लागताच शहराच्या विविध भागात दोन दुकाने फोडून चोरट्यांनी ड्रायफ्रुट आणि किराणा सामान चोरून नेले.
दिलीप आत्माराम तातडे (वय ३६,रा.न्यु.मोंढा, जाधववाडी परिसर) यांचे हरिश्चंद्र कॉम्पलेक्स येथे अमोल मसाले आणि ड्रायफ्रुट या नावाचे दुकान आहे. चोरट्यांनी २८ मे च्या रात्री दुकानाचे शटर उचकटून दुकानातील ड्रायफ्रुट आणि रोख रक्कम असा एकुण १९ हजार २५० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. दुसरी घटना, बीडबायपास रोड परिसरातील अरिहंत बिझनेस कॉम्पलेक्स येथे घडली.
संजय बाबूलाल पांडे (वय ५१,रा.विजयालक्ष्मी प्राईड, हरिरामनगर) यांच्या दुकानाच्या पाठीमागील खिडगीची ग्रील तोडून दुकानात शिरलेल्या चोरट्याने दुकानातून जवळपास ६७ हजार रूपये किंमतीचे महागड्या सिगारेट, ड्रायफ्रुट आणि कोलगेट, चहापत्ती व इतर किराणा सामान चोरून नेले. विविध भागात दुकाने फोडून ड्रायफ्रुट व किराणा सामान चोरून नेणाऱ्या चोरट्याविरूध्द अनुक्रमे सिडको आणि पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘विजय वडेट्टीवार यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं खातं द्यायला हवं होतं, मात्र…’
- पुण्यात उद्यापासून नियम आणखी कडक; जाणून घ्या आज किती रुग्ण संख्या
- औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट
- ‘तो वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’; विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
- ‘सत्तेचा माज किती असू शकतो त्याचे हे जिवंत उदाहरण’; भातखळकरांचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

