नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत होती त्यामुळे आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत असल्याचे मागील काही दिवसांपूर्वी आपल्याला पाहायला मिळाले होते. तर कोरोनामुळे अनेक कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट कोसळले.
या भीषण परिस्थितीमुळे वर्षभरापासून भारताचीअर्थव्यवस्था मंदावली आहे. लॉकडाऊनमुळे प्रत्येक क्षेत्राला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे या क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने जवळपास १.१ लाख कोटींच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. कोरोनामुळे डगमगलेल्या अर्थव्यवस्थेला नव्याने उभारी देण्यासाठी अनेक मोठ्या घोषण्या केल्या आहेत.
आरोग्य विभागासाठी ५० हजार कोटींची घोषणा केली आहे. हे पैसे नॉन मेट्रो मेडिकल इन्फ्रासाठी खर्च केले जातील. इतर विभागासाठी ६० कोटींची घोषणा केली आहे. दरम्यान कोरोना दुसऱ्या लाटेमुळे अनेक क्षेत्र संकटात असून सरकारकडून सातत्याने मदत मागितली जात आहे. सरकारने गेल्या दिवसात त्या क्षेत्रासाठी मदत करण्यास सरकार विचार करत असल्याचे संकेत दिले आहे.
आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी छोट्या उद्योगांना दिलासा देण्यासाठी इमरजेंसी क्रेडिट लाइन गारंटी स्कीमसाठी निधी वाढवण्याची घोषणा केली. आता ही स्कीम ३ लाख कोटी रुपये असून आता ती वाढवून ४.५ लाख कोटी रुपये केली आहे. या स्कीम अंतर्गत आतापर्यंत एमएसएमइ, हॉस्पिटॅलिटी विभागाला २.६९ लाख कोटी रुपयांची वितरण केले गेले आहे.
याशिवाय मायक्रो फायनेंस इन्स्टिट्यूशनमाध्यमातून दिल्या जाणाऱ्या कर्जासाठी क्रेडिट गारंटी स्कीमची घोषणा केली गेली आहे. ही एक नवीन स्कीम आहे. याअंतर्गत कमर्शिअल बँकचे एमएफआयला दिल्या गेलेल्या नवीन आणि सध्याच्या कर्जासाठी गारंटी दिली जाईल. या योजनामुळे २५ लाख लोकांचा फायदा होण्याची आशा आहे.
दरम्यान यापूर्वी कोरोनावरील उपचार खर्चावर कोणताही टॅक्स वसुल केला जाणार नाही. असे अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे जर एखाद्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यास किंवा एखाद्या व्यक्तीस कोरोना उपचारांसाठी आर्थिक मदत पुरविली तर ती आर्थिक मदत कर्मचारी आणि लाभार्थीसाठी पूर्णपणे करमुक्त असणार आहे. तसेच कोरोना मृत्यूआधी झालेल्या हॉस्पीटलच्या खर्चावरही सरकार टॅक्स लावणार नाही.
महत्वाच्या बातम्या
- आता कस्तुरबा रुग्णालयात ‘डेल्टा प्लस’ होणार चाचणी ; दोन दिवसात मिळणार रिपोर्ट
- पुण्यात उद्यापासून नियम आणखी कडक; जाणून घ्या आज किती रुग्ण संख्या
- औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट
- ‘तो वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’; विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
- ‘सत्तेचा माज किती असू शकतो त्याचे हे जिवंत उदाहरण’; भातखळकरांचा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

