Share

‘आता भाजपाला ज्योतिषी बदलण्याची गरज’, शेलारांच्या भाकितावर थोरातांचा टोला

Published On: 

पुणे : भाजप नेते आशिष शेलार यांनी शुक्रवारी पुण्यातील मावळ येथे एका कार्यक्रमात बोलताना ‘राज्यात केव्हाही निवडणुका लागू शकतात’, असं भाकित वर्तवलं होते. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये त्याविषयी मोठी चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात तर्क-वितर्क लढवले जाऊ लागलेत.

त्यांच्या या भाकितावर काँग्रेस नेते तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. ‘महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजपकडून भाकीतं केली जात आहेत. मात्र, आता भाजपाला ज्योतिषी बदलण्याची गरज आहे’, असे थोरात म्हणाले. पुणे येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपला टोला लगावला.

राज्यात लवकरच निवडणूक लागू शकते, दोन पक्ष आम्हाला तसे संकेत देत आहेत, असं नवं भाकित भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलं आहे. तसंच, त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका देखील केली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचं हे सरकार घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असल्याचा घणाघात शेलार यांनी केला होता.

यानंतर शेलार यांनी नेमके कोणत्या आधारावर हे भाकित वर्तवले याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भूमिका मांडली आहे. ‘भाजपा मध्यावधी किंवा नियमित निवडणुका झाल्या, तरी आपल्या ताकदीवर निवडणुका लढवेल. विधानसभेच्या २८८ किंवा लोकसभेच्या ४८ जागा लढवण्याची देखील आमची तयारी आहे. आशिष शेलारांचं विश्लेषण या आधारावर आहे की इतके भांडूनही हे कुणी बाहेर पडत नाहीत. भांडणाचे दोनच परिणाम होतात. एक तर आघाडीतून बाहेर पडणे किंवा दुसरे म्हणजे निवडणुकीला सामोरे जाणे. हे बाहेर पडतच नाहीत, असे पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!