औरंगाबाद : भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या मका प्रकरणात सात महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या मालाची दखल न घेतल्याने वैजापूर सजाचे तलाठी जितेंद्र चापानेरकर यांना महसूल प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. भरड धान्य खरेदी योजने अंतर्गत वैजापूर येथील खरेदी केंद्रांवर मका खरेदी सुरू होती.
त्यावेळी खरेदीचे उद्दीष्ट पुर्ण झाल्यामुळे शासनाचे पोर्टल बंद झाले. त्यानंतर खरेदी विक्री संघाने १० शेतकऱ्यांकडील ३४३ क्विंटल मका खरेदी केली.ही मका इतर मका बरोबरच गोडावून किपर तथा वैजापूर सजाचे तलाठी जितेंद्र चापानेरकर यांच्या ताब्यात देण्यात आली. मात्र, ऑनलाईन पोर्टल बंद झाल्यानंतर खरेदी करण्यात आलेली मका संबंधित शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश शासनाने खरेदी विक्री संघाला दिले.
परंतू सदर मका गोडावून किपर यांच्या ताब्यात असल्याने संघाने गोडावून किपर चापानेरकर यांना पत्र पाठवून शेतकऱ्यांची मका परत करण्याची विनंती केली. मात्र सात महिने उलटुनही वैजापूर महसूल विभाग, खरेदी-विक्री संघ, मार्केटिंग फेडरेशन ,तलाठी चापानेरकर यांनी कुठलीही दखल घेतली नाही. शेतकऱ्यांना मका ही नाही व पेमेंटही नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. संतप्त शेतकऱ्यांनी ५ फेब्रूवारीपासून तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. याप्रकरणी तलाठी जितेंद्र चापानेरकर यांना तहसीलदार राहुल गायकवाड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अखेर शेतकरी आंदोलनावर समलमान खानने सोडले मौन, म्हणाला…
- मध्यम वर्गीयांचा अपेक्षाभंग; आरबीआयकडून पतधोरण जाहीर !
- प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होत असलेल्या नाना पटोले यांना ‘या’ आव्हानांचा करावा लागू शकतो सामना
- पुण्यामध्ये पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर! 93 रुपये प्रति लीटरने होतेय विक्री
- ‘शेतकरी आंदोलनात माझ्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

