Share

हेल्मेट न घालणे कायद्याचे उल्लंघन, पण निष्काळजीपणा नाही; हायकोर्टाचा निर्णय

Published On: 

कोच्ची : हेल्मेट न घातल्याने अपघातप्रकरणी भरपाई कमी करण्याचा लवादाचा आदेश केरळ उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला होता. त्याने हेल्मेट न घातल्याने लवादाने भरपाईची रक्कम कमी केली होती. यानंतर मृताच्या कुटुंबीयांनी या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

केरळच्या हायकोर्टाने सांगितले की, अपघातात मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट न घातल्याने कायद्याचे उल्लंघन केले हे खरे आहे. तरीही तरी त्याने निष्काळजीपणा केला असे म्हटले जाऊ शकत नाही. अपघातात ‘निष्काळजीपणा’ प्रत्येक प्रकरणात तथ्य आणि परिस्थितीच्या दृष्टीने ठरवला जातो. त्याने हेल्मेट घातले असते तर त्याचा जीव वाचला असता.

जीव जाईल एवढी गंभीर जखम झाली नसती. हेल्मेट न घालण्यास आपण बाइकला धडक देण्याचे कारण म्हणू शकत नाहीत. जो अपघात झाला त्यात निष्काळजीपणा होता, हे ठरवण्याची गरज आहे. पण न्यायालयाने इशारा दिला की, त्यांच्या या आदेशाला हेल्मेट न घालता गाडी चालवण्याचा परवाना समजू नये.

ही घटना ८ ऑगस्ट २००७ ची आहे. मोहंमदकुट्टी वैद्याक्करन मुलासोबत दुचाकीवर जात होते. समोरून येणाऱ्या वाहनाने त्यांच्या वाहनाला धडक दिली. अपघातात दोघे जखमी झाले. वैद्याक्करन यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबीयांना ३३ लाख ३७९९ रुपयांची भरपाई मंजूर झाली. पण ट्रिब्यूनलने वैद्याक्करन यांनी हेल्मेट न घातल्याने अपघातात त्यांचा निष्काळजीपणाला जबाबदार धरत भरपाईतून २० टक्के रक्कम कमी केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!