मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोनाचा कहर वाढतच आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेला सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी सॅनिटायझर डिस्पेन्सिंग मशिन्स बसवण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. सिटिझन सर्कल फॉर सोशल वेल्फेअर अँड एज्युकेशन संस्थेने ही मागणी केली आहे. याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
याचिकेत म्हटले आहे की, मार्चपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. रुग्णालये, खाटा, औषधे यासाठी राज्य आणि मनपाने तयारी केली आहे. पण सार्वजनिक ठिकाणी घेण्यात येणारी काळजी अथवा खबरदारी राखण्यास मनपा अयशस्वी ठरत आहे. तसेच टाळेबंदी आणि संचारबंदी काळात याचिकाकर्त्यांनी विविध रेल्वे, बस स्थानक आदी ठिकाणी भेट दिल्यानंतर त्यांना स्वच्छताविषयक अथवा कोरोना रोखण्यासाठी सॅनिटायझर मशीन कुठेही बसवलेले आढळले नाहीत.
कोरोनाला रोखण्यासाठी निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता आवश्यक आहे, म्हणून सार्वजनिक ठिकाणी विशेषत: मुंबईतील रेल्वे स्थानकांवर, रेल्वेत सॅनिटायझर लिक्विड डिस्पेन्सिंग मशीन बसवण्यात यावे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना परवानगी देण्यापूर्वी तापमान तपासण्याची सोय करावी. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यास मदत होईल, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘बंगालमध्ये मोदी सरकारकडून फोन टॅपिंग’, ममतांचा गंभीर आरोप
- धक्कादायक! ‘मृतदेहांसोबत रॅली काढा’, ममतांची ऑडिओ क्लिप व्हायरल
- ‘दीदी स्वत:ला राज्यघटनेपेक्षा मोठ्या समजतात’, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
- पोषणाविषयी जनजागृतीसाठी ‘आहार क्रांती’ अभियान, केंद्राचा नवा उपक्रम
- “स्व.बाळासाहेबांच्याच शब्दात बोलायचं तर हे ‘येड#$%’ सरकार आहे”; नितेश राणेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

