Share

चिंताजनक! देशात सर्वाधिक कोरोना संसर्ग नाशिकमध्ये

Published On: 

नाशिक : राज्य आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. राज्याची स्थिती तर अत्यंत बिकट झाली आहे. त्यातच आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. कोरोना संसर्ग वाढीत देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये असलेले नाशिक आता पहिल्या क्रमांकावर आलेय. महाराष्ट्रात कोरोना सर्वात जास्त नाशिक, नागपूर, पुणे आणि मुंबईत आहे. पाचव्या स्थानी लखनऊ, सहाव्या बंगळुरू, सातव्या भोपाळ, आठव्या इंदूर, नवव्या पटणा आणि दहाव्या क्रमांकावर नवी दिल्ली आहे.

आकडेवारीनूसार, गेल्या महिन्यात नाशिकमध्ये दररोज सरासरी ३ हजार ९४७ रुग्ण आढळले. तर दहा लाख लोकांमागे दररोज १ हजार ८५९ रुग्ण आढळले आहे. संपूर्ण मार्च महिन्यात ९ लाख ७ हजार ७६५ कोविड रुग्ण आढळले आहेत, तर मार्च महिन्यातील दहा लाख लोकांमागील हा आकडा ४६ हजार ५० इतक्यावर पोहोचला. १६ मार्च ते १५ एप्रिलदरम्यान मुंबईमध्ये ३.७ लाख नवे रुग्ण आढळले. हे कोणत्याही शहरामध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.

सर्वाधिक बाधित रुग्णांच्या शहरांमध्ये त्यांनतर नवी दिल्लीचा क्रमांक आहे. काही शहरांमध्ये रुग्णांची आकडेवारी लपवण्यासाठी दिशाभूल करणारे आकडे दिले जाऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक शहरामध्ये दहा लाख लोकांमागे किती रुग्ण आढळत आहेत, हे पाहिल्यास कमी अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमधील रुग्णसंख्येची तुलना करता येणार आहे.

मार्चमध्ये मुंबई आणि दिल्लीमधील २० लाख लोकांमागे एका दिवसात अनुक्रमे १९ हजार ४०० आणि १४ हजार ३०० हून अधिक रुग्ण आढळले. परंतु १५ एप्रिलला लखनऊला सर्वाधिक ४ हजार ५०० रुग्ण आढळले आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत हेच प्रमाण सर्वाधिक आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!