कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात त्या तृणमूलच्या उमेदवाराला कूचबिहार जिल्ह्यात ‘सीआयएसएफ’च्या गोळीबारात ठार झालेल्या ४ जणांच्या मृतदेहांसोबत रॅली काढण्याचे सांगत आहेत. या प्रकाराने बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपने या प्रकरणी निवडणूक आयोगाची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर ममतांनी ही क्लिप बनावट असल्याचे सांगत आपला फोन केंद्र सरकारकडून टॅप होत असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची घोषणा केली आहे.
ममता म्हणाल्या, ‘भाजप तृणमूल काँग्रेसला विकासाच्या मुद्यावर आव्हान देवू शकत नाही. त्यामुळे ते अशा बोगस ध्वनिफिती जारी करुन आमची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आमचे दैनंदिन संभाषणही डोकावून पाहत आहेत.
भाजप आमचे फोन टॅप करत आहे. त्यामुळे आमचे सरकार या प्रकरणात हात असणाऱ्या सर्वच व्यक्तींचा शोध घेईल. या प्रकरणी लवकरच सीआयडी चौकशीचे आदेश दिले जातील’, असे त्या म्हणाल्या. अशा प्रकरणांत केंद्रीय निमलष्करी दलांचे काही अधिकारी व एजंट्सचा हात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ‘यात भाजपचा हात आहे हे स्पष्ट आहे. पण, त्यानंतरही ते याच्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा करत आहेत’, असेही ममता यावेळी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! ‘मृतदेहांसोबत रॅली काढा’, ममतांची ऑडिओ क्लिप व्हायरल
- ‘दीदी स्वत:ला राज्यघटनेपेक्षा मोठ्या समजतात’, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
- पोषणाविषयी जनजागृतीसाठी ‘आहार क्रांती’ अभियान, केंद्राचा नवा उपक्रम
- “स्व.बाळासाहेबांच्याच शब्दात बोलायचं तर हे ‘येड#$%’ सरकार आहे”; नितेश राणेंचा टोला
- ‘अरे जनाबसैनिका, मंदबुद्धी…ते जंतू नसतात विषाणू असतात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

