अहमदनगर : कोरोना हे जागतिक संकट आहे. आपला जीव वाचवण्यासाठी लॉकडाउन हाच एकमेव उपाय आहे. १ मेपर्यंत कडक लॉकडाऊन करा. कोरोनावर कोणीही राजकारण करू नये. राजकारण करण्यासाठी पुढे दिवस आहेत, असा टोला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला लगावला.
श्रीगोंदे येथे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या कोविड हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी थोरात म्हणाले की, शासन कोरोनाच्या महामारीत आधार मदत करण्याची भूमिका घेत आहे. श्रीगोंद्यात कोरोना सेंटर सुरू केले, ही चांगली बाब आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी होमक्वारंटाइन होण्याऐवजी हेल्थ केअर सेंटरमध्ये उपचार घ्यावेत. ऑक्सिजन, रेमडीसिवर इंजेक्शन, इतर औषधे व लस उपलब्ध करण्याचा प्रयत्न चालू आहे.
यावेळी आमदार बबनराव पाचपुते म्हणाले, कोरोनात शासनाने सतर्क राहण्याची गरज होती. निधी उपलब्ध करणे आवश्यक होते. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा चांगली काम करत आहे. आमदार निधीतून दोन रुग्णवाहिका व दोन व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले. परिक्रमात कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारविरोधात नाभिक समाजबांधवांचे मुंडण आंदोलन
- चिंताजनक! देशात सर्वाधिक कोरोना संसर्ग नाशिकमध्ये
- सार्वजनिक ठिकाणे निर्जंतुकीकरण करण्यासाठी हायकोर्टात याचिका
- ‘बंगालमध्ये मोदी सरकारकडून फोन टॅपिंग’, ममतांचा गंभीर आरोप
- धक्कादायक! ‘मृतदेहांसोबत रॅली काढा’, ममतांची ऑडिओ क्लिप व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

