जळगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने कडक निर्बंध लागू केलेत. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतर घटकांना मदत जाहीर करत नाभिक समाजाला आर्थिक मदतीपासून वंचित ठेवले. याविरोधात भडगाव शहर व तालुक्यातील नाभिक समाजबांधवांनी गिरणा नदी पात्रात मुंडण करत आंदोलन केले.
आंदोलक म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वप्रथम सलून, पार्लर व्यवसाय बंद केला. मागील लॉकडाऊनवेळीही हीच स्थिती होती. सलून, पार्लर बंदमुळे आपल्या समाज बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाभिक समाज बांधवांना मदत जाहीर करतील अशी अपेक्षा होती.
मागील वर्षी देखील लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंदमुळे खचलेल्या समाज बांधवांनी आत्महत्या केल्या. यंदाही चोपडा तालुक्यातील वैजापूर येथे गणेश सैंदाणे, उस्मानाबाद येथे मनोज झेंडे यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या वारसांना शासनाने मदत जाहीर केली नाही. लॉकडाऊनमुळे प्रभावित इतर घटकांना मदत देताना नाभिक समाजाला मदत न देणे हा अन्याय आहे. नाभिक समाजाने किती अन्याय सहन करायचा, असा सवाल आंदोलकांनी केला. त्यामुळे राज्य सरकारचा निषेध करत मुंडण करून नाभिक समाजातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
- चिंताजनक! देशात सर्वाधिक कोरोना संसर्ग नाशिकमध्ये
- सार्वजनिक ठिकाणे निर्जंतुकीकरण करण्यासाठी हायकोर्टात याचिका
- ‘बंगालमध्ये मोदी सरकारकडून फोन टॅपिंग’, ममतांचा गंभीर आरोप
- धक्कादायक! ‘मृतदेहांसोबत रॅली काढा’, ममतांची ऑडिओ क्लिप व्हायरल
- ‘दीदी स्वत:ला राज्यघटनेपेक्षा मोठ्या समजतात’, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

