Share

‘चित्रा’ या चित्रातील वाघ नव्हे, त्या तर खऱ्याखुऱ्या वाघीन!, सदाभाऊंनी केले कौतूक

Published On: 

🕒 1 min read

सांगली : ‘चित्रा ताई या चित्रातील वाघ नाही ,तर त्या खऱ्या खुऱ्या वाघीन आहेत. तिच्या डरकाळीने तुमचे सरकार जमीनदोस्त होईल. अशी टीका माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पूजा चव्हाण प्रकरणात ठाकरे सरकारवर केली आहे.

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पूजा चव्हाण या तरुणीचा पुण्यात मृत्यू झाला आहे. संजय राठोड यांचा पूजा चव्हाणच्या मृत्यूशी संबंध असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यात भाजप नेत्या चित्रा वाघ आघाडीवर आहेत. पूजाच्या गूढ मृत्यू प्रकरणाचा पाठपुरावा चित्रा वाघ करत आहेत.

दरम्यान, लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने १२ फेब्रुवारी रोजी त्यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चित्रा वाघ यांच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे. याच पार्श्वभूमीवर माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी याबाबत चित्रा वाघ यांची बाजू घेत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

ते म्हणाले , ‘चित्रा वाघ अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे. त्यांचा पती विरोधात दीड वर्षा पूर्वीचे प्रकरण उकरून काढून गुन्हा दाखल करण्यात आला. दीड वर्ष तुम्ही अफू घेत होता का ? की झोपले होता असा सवाल त्यानी उपस्थित केला आहे. चित्रा ताई या चित्रातील वाघ नाही ,तर त्या खऱ्या खुऱ्या वाघीन आहेत. या वाघीणीला जर तुम्ही पिंजऱ्यात बंद करायचा प्रयत्न केला तर तिच्या डरकाळीने तुमचे सरकार जमीनदोस्त होईल. अशी चेतावनीच त्यानी ठाकरे सरकारला दिली आहे’.

महत्त्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!