मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ‘ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन कोण होणार ?’ या विषयावर चर्चा सुरु आहे.स्टीव्ह स्मिथला पुन्हा कॅप्टन होण्याची इच्छा होती परंतु स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलिया संघाचा कॅप्टन बनवणार नाही हे नक्की झालं आहे. 2018 साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर बॉलची छेडछाड केल्याच्या प्रकरणात स्मिथवर एक वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे स्मिथला कॅप्टनसी सोडावी लागली होती. सध्या टीम पेन हा टेस्ट टीमचा तर आरोन फिंचहा वन-डे आणि टी20 टीमचा कॅप्टन आहे. या सर्व चर्चेमध्ये आता ऑस्ट्रेलियाला 2015 साली वर्ल्ड कप जिंकून देणारा कॅप्टन मायकल क्लार्क याने उडी घेतली आहे.
क्लार्कनं ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनसाठी पॅट कमिन्सचं नाव सुचवलं आहे. कमिन्स आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स टीमचा सदस्य आहे. पॅट कमिन्स हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारत ऑस्ट्रेलिया टीमचा कॅप्टन म्हणून योग्य उमेदवार आहे, असं मत क्लार्कनं ‘फॉक्स क्रिकेट’ शी बोलताना व्यक्त केले आहे. ‘फक्त कमिन्सच मला कॅप्टन करा आणि मी त्यासाठी योग्य आहे, असं सध्या म्हणत नाही. याचा अर्थ तो चांगला नेता नाही, असा होत नाही,’ असे क्लार्कने स्पष्ट केले.
दरम्यान, कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) करंडक जिंकण्यासाठी बेताब आहे. कोलकाता नाइट रायडर्स या संघाने सहा वर्षांपूर्वी ट्रॉफी जिंकली होती. केकेआर आयपीएलच्या तीन संघांपैकी एक आहे ज्यांच्या नावावर एकापेक्षा जास्त वेळा आयपीएल करंडक आहे. सर्वाधिक वेळा जेतेपद मिळविण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. मुंबई इंडियन्स पाच वेळा आयपीएल चॅम्पियन आहे. मुंबईशिवाय चेन्नई सुपर किंग्ज तीन वेळा आयपीएल चॅम्पियन बनला आहे. केकेआरने दोनदा आयपीएल करंडक जिंकला आहे. यावेळी केकेआर आयपीएलचे विजेपेपद मिळवण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भारतीय महिला संघात कोरोनाचा शिरकाव; हरमनप्रीत कौरला कोरोनाची लागण
- बॉलिवूडवर कोरोनाचं सावट ; प्रसिद्ध संगीतकार ‘बप्पी लहरी’ कोरोना पॉजिटीव्ह
- आयपीएल आधी मुंबई, चेन्नई आणि दिल्लीच्या संघांना मोठे धक्के
- ‘कोरोना आम्हाला स्पर्शही करणार नाही’ या फाजील आत्मविश्वासातून कोरोना वाढत गेला’
- बीड जिल्हा; पीपीई कीट घालून जिल्हाधिकारी रवींद्र जगताप कोरोना रुग्णांच्या भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

