Share

अजित पवारांवर राग नाहीच, दगाबाज तर शिवसेना ; चंद्रकांत पाटलांचा घणाघात

Published On: 

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या घटनाक्रमावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. पहाटेच्या शपथविधी वरून चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर बोचरी टीका केली होती. याच मुद्द्यावरून महाराष्ट्रातील या दोन बड्या नेत्यांमध्ये शा‍ब्दिक चकमक सुरू आहे.

चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र झोपेत असताना पडेल असे देखील भाकित केले होते. त्यावर अजित पवारांनी कडाडून टीका केली होती. त्यामुळे संतापलेल्या चंद्रकांत पाटलांनी ‘अजित पवारांनी भाषा जपून वापरावी’ असा इशाराच दिला होता. आता या वादावर चंद्रकांत पाटील यांना पडदा टाकत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

आमचा राग अजित पवार यांच्यावर नसून दगाबाज शिवसेनेवर असल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे. ते पुढं म्हणाले की, अ’जित पवार आणि माझा काही बांधाला बांध नाही. आमचा वैयक्तीक वादही नाही. मात्र ते आमच्या पक्षाबद्दल बोलले तर मी बोलणारच, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बोलल्यास आम्ही बोलणारच. दरम्यान सरकार पडलं म्हणून माझा आणि देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवार यांच्यावर राग नाहीच. शिवसेनेने आम्हाला दगा दिला, त्यामुळे त्यांच्यावर राग आहे,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. तसेच यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर टीका केली. या सरकारमध्ये कोणत्याही मुद्द्यावर एकवाक्यता नाही. प्रत्येकाला माध्यमांसमोर येण्याची घाई झाल्याचं ते देखील ते यावेळी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!