मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या काही मंत्र्यांवर विविध प्रकरणांवरून ईडी, सीबीआयची कारवाई सुरू आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या इशाऱ्यानूसारच राजकीय हेतूने ही कारवाई होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होत आहे. मात्र, तरीही सोमय्या काही कालावधीच्या अंतरावर एकेका मंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत तक्रार दाखल करत आहेत.
त्यानंतर आता ठाकरे सरकारमधील ११ नव्हे तर २० मंत्र्याचे भ्रष्टाचार लवकरच बाहेर येणार असल्याचा गौप्यस्फोट सोमय्या यांनी केला आहे. अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक आणि अनिल परबही जेलमध्ये जातील. त्यावेळी सर्वांचीच झोप उडेल, असेही ते म्हणालेत. सोमय्या यांनी आज रविवारी पाचपाखाडी येथील केबीपी महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ११ भ्रष्टाचारी नेते आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती मला कुठून येते हे मी तुम्हाला का सांगू? मला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबतचीही माहिती मिळत असते. आता ११ ऐवजी २० मंत्र्यांची नावे लवकरच समोर येतील. मला अनेक ठिकाणाहून फोन येतात. उद्या कोण टार्गेट आहे असे विचारले जाते. कोणाचा भ्रष्टाचार बाहेर येणार असे विचारण्यात येते, असे त्यांनी सांगितले. तसेच मी नुकताच कोल्हापूरला जाऊन आलो आहे. अंबाबाईचा आशीर्वाद घेतला आहे. आता मी बुधवारी बारामतीला जात आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- सहकारी चळवळीसाठी अमित शहांचे योगदान चांगलं राहील- शरद पवार
- कथित ऑडिओ क्लिपमध्ये रामदास कदमांना फोनवर बोलणारे प्रसाद कर्वे आहेत तरी कोण?
- फडणवीसांना शिवसेना नेता भेटला, अन् देगलूर पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला!
- ‘कानून वापसी नहीं तो घर वापसी नही’, कृषी कायद्यावरून टिकैत यांचा केंद्राला इशारा
- ‘तो माझा आवाज नाही, व्हायरल ऑडिओ क्लिपची चौकशी करा’, प्रसाद कर्वेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

