Share

पहिला व दुसरा डोस घेतलेल्या पैकी एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही : पालकमंत्री

Published On: 

परभणी : शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोनाचा पहिला तसेच दुसरा डोस घेतलेल्या रुग्णांपैकी एकाही रुग्णाचा अद्यापपर्यंत मृत्यू झाला नाही, असा दावा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, महापालिका आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारीसह आदी उपस्थित होते. परभणी जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६५ हजार ९९२ नागरकांनी लस घेतली आहे. त्यापैकी १ लाख १३ हजार ५५८ व्यक्तींनी पहिला डोस तसेच १५ हजार १०१ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षावरील पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांपैकी एकाही रुग्णांचा अद्यापपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेला नाही, असेही या वेळी मलीक यांनी सांगितले.

या लसीकरण मोहिमेतून फायदाच होतो. हे स्पष्ट आहे, असे नमुद करीत जिल्ह्यात लसीकरण मोहीम प्रभावीपणे विशेषतः बुथनिहाय राबविण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनार्फे नियोजन केले जात आहे, असेही ते म्हणाले. लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. केंद्र सरकारद्वारे या अनुषंगाने पुरवठा होत नाही, असेही पालकमंत्री मलिक यांनी या वेळी सांगितले. लसीकरण मोहिमेकरिता राज्य सरकार आवश्यक तेवढा पैसा खर्च करावयास तयार आहे, असाही दावा केला. लस आयात करावयास परवानगी मिळाल्यास लस आयातही करू असेही त्यांनी या वेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!