Share

कोविड रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावा, ग्राहक पंचायतची मागणी

Published On: 

यवतमाळ : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता डॉक्टर व रुग्ण यांचे संबंधात अधिक विश्वास निर्माण होण्यासाठी कोविड रुग्णालये व अतिदक्षता विभागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, अशी व्यवस्था खासगी रुग्णालयाच्या प्रशासनासाठी शासनाने अनिवार्य करावे, अशी मागणी यवतमाळ जिल्हा ग्राहक पंचायतने शासनास पाठवलेल्या एका निवेदनातून केली आहे.

राज्यातील अनेक रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. कोरोना रुग्णाला एकदा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तो पूर्णपणे रुग्णालय प्रशासनाच्या १०० टक्के ताब्यात असतो. त्याच्यावर करण्यात येत असलेल्या उपचाराबाबत कुटुंबीय अनभिज्ञ व अंधारात असते. काही रुग्णालयामध्ये रुग्ण दाखल करताना भरमसाठ रक्कम उपचारापूर्वीच मागण्यात येते. रुग्णांच्या उपचाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्या जात असल्याच्या तक्रारी ही काही रुग्णालयाच्या संदर्भात प्राप्त झाल्यात.

प्रशासनाकडे सुद्धा अशा तक्रारी पाठवण्यात आलेल्या आहेत.बरेचदा तक्रारी डॉक्टर व रुग्णांचे नातेवाईक यांच्यामधल्या पुरेशा विश्वासाच्या अभावतूनही केल्या जातात. काही वेळा उपचारादरम्यान रुग्ण दगावल्यास रुग्णांचे नातेवाईक हिंसक होऊन रुग्णालयाच्या प्रशासनासोबत यांचे भांडण – वाद होऊन त्याचे पर्यावसान तोडफोडीमध्ये सुध्दा झाल्याची घटना घडल्या आहेत. यामुळे कोविड रुग्णालये व अतिदक्षता विभागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, अशी मागणी जिल्हा ग्राहक पंचायतने केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!