औरंगाबाद : अठरा वर्षावरील युवकांच्या लसीकरणास शनिवार (दि.१) पासून औरंगाबाद महानगरपालिकेने थाटामाटात सुरुवात केली. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या विशेष उपस्थितीत मुकुंदवाडी आरोग्य केंद्र येथे या मोहिमेचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी २८ वर्षीय नेहारीका शहा व २१ वर्षीय नीलय शहा यांनी सर्व प्रथम लस घेत १८ प्लस लसीकरण मोहिमेचा श्रीगणेशा केला. मात्र यापुढे लसींअभावी हि मोहिम बंद पडू नये म्हणजे झाले. यासाठी वेळोवेळी लसींचा पुरवठा होणे आवश्यक आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने शहरातील तीन आरोग्य केंद्रात १८ ते ४४ वयोगटातील युवा वर्गास लसीकरण सुरु करण्यात आले. प्रशासक अास्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशान्वये मुकुंदवाडी, कैसर कॉलनी, व सादातनगर येथील आरोग्य केंद्रात पहिल्या टप्प्यात लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आज दुपारी दोन वाजता मुकुंदवाडी आरोग्य केंद्र येथे या मोहिमेचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी युवकांनी उत्साहवर्धक वातावरणात लस टोचून घेतली. या मोहिमेत लहू घोडके, अस्मिता बुक्तारे, आस्मिता वाघमारे, सिस्टर सुनंदा चव्हाण, मनीषा कोकाटे, कांतीलाल भोये यांनी परिश्रम घेतले.
लस घेण्यासाठी लाभार्थ्यांनी कोविन ॲप वर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. अशा प्रत्येकी १०० लाभार्थ्यांना प्रत्येक केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. कोविन ॲप वर आपण अपॉइंटमेंट ऑप्शन सिलेक्ट करावे. त्या ठिकाणी तिन्ही आरोग्य केंद्राची नावे दिसतील लाभार्थ्यांनी आपल्या जवळील एका केंद्राला सिलेक्ट करायचे आहे. नोंदणीशिवाय १८ ते ४४ वयोगटातील नागरिक लस घेऊ शकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- हसनखेडा भागात शेतात मृतावस्थेत आढळला बिबट बछडा
- नांदेडचे प्रशासन लागले कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थांबवण्यासाठीच्या कामाला
- कोविड रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावा, ग्राहक पंचायतची मागणी
- केज मध्ये भरला बाजार; जबाबदार कोण, नियोजनशून्य पंचायत की बेशिस्त नागरिक ?
- दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी रेड्डीला सामान्य कैद्यांप्रमाणे वागणूक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

