Share

 हसनखेडा भागात शेतात मृतावस्थेत आढळला बिबट बछडा

Published On: 

औरंगाबाद : मौजे हसनखेडा येथे दि. ३० एप्रिल रोजी रात्री शेतकरी नारायण बाजीराव दळवी यांच्या शेतामध्ये बिबट्या आढळल्याची माहिती मिळताच उपवनसंरक्षक एस. व्ही. मंकावार यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी व वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले.रात्रीची वेळ असल्याने टॉर्च च्या साह्याने शेत वस्तीतील आजूबाजूचा परिसर संपूर्ण फ़िरस्ती केली. परंतु, बिबट्या बाबत ठावठिकाणा मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच १ मे रोजी वनपाल आर.डी. पठाण , वनरक्षक नारायण ताठे यांच्यासमवेत शीघ्र कृती दल सदस्य एम. ए. शेख, अमोल वाघमारे, एस. एम. माळी यांनी गट नंबर ५० मध्ये पाहणी केली. तेंव्हा त्यांना मृतावस्थेत एक बिबट पिल्लू निदर्शनास आले.

यानंतर सहाय्यक वनसंरक्षक कन्नड एस.यु शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नडअण्णासाहेब पेहरकर यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी बी. आर. चव्हाण, विजय इटवले यांनी तपासणी केली असता नर बिबट पिलाचे वय साधारणता: ४५ ते ५० दिवसांचा असावे असे सांगण्यात आले.

मकरणपुर रोपवाटिका येथे वनाधिकारी यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी बिबट पिलाचे चे शवविच्छेदन केले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. शवविच्छेदनदरम्यान बिबट पिल्लाच्या अवयवाचे नमूना घेण्यात आले आहेत. आजारपणाने बिबट पिलाचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृतावस्थेत आढळलेल्या बिबट पिलाचे सर्व अवयव शाबूत होते.

मृत्यूचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी कन्नड हे करीत आहेत. मागील काही दिवसापासून कन्नड प्रा. वनपरिक्षेत्रातील हतनुर, जवळी, चापानेर भागात बिबट्या आढळून आल्याने वनविभागाकडून कॅमेरा ट्रॅप लावणे, गस्त करणे, जनजागृती करणे, अशा विविध उपाययोजना सुरू आहेत. नागरिकांनी वन्यप्राणी दिसल्यास घाबरून न जाता तात्काळ वनविभागाशी संपर्क करावा. असे आवाहन वनपरिक्षेत्राधिकारी कन्नड प्रा. यांनीं केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!