नांदेड : कोरानाच्या पहिल्या लाटेनंतर बिनधास्त राहिलेल्या प्रशासनाची खुप नाचक्की झाली. तर यात ऑक्सिजन, इंजेक्शन, बेड आदींची पडणारी कमतरता ही बाब आता खुपच गंभीर झाली आहे. त्यामुळे दुसरी लाट देखील अश्याच स्वरुपात सुरु आहे. त्यामुळे आता प्रशासन तिसऱ्या लाटेच्या तयारीला लागलेले आहे.
कोरानाच्या संसर्गाचा कहर २०१९ फेब्रुवारीपासून सुरु झाली. तर मार्च मध्ये देशभर लॉकडाऊन लागले होते. तर या वेळी ऑक्सिजन, बेड, रुग्णालयमध्ये कोराेना रुग्णांच्या तुलनेत आरोग्य सुविधा खुपच तोकड्या स्वरुपात होत्या. आता मात्र दुसरी लाट थोडीशी कमी होताना दिसत आहे. परंतू आता पुर्वी सारखे गाफीस न राहता प्रशासनाने तिसऱ्या लाटेची तयारी करण्यासाठी कंबर कसली आहे. तसेच प्रशासनाने तिसऱ्या लाटेती तयारी करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत.
पहिल्या लाटेमध्ये आरोग्य विभागास जिल्हा प्रशासनाची देखील कोणतीत तयारी झालेली नव्हती. रुग्ण संख्या कमी होती. परंतू कोणता उपचार करावा, या बाबत सर्व जन अनभिज्ञ होते. त्यामुळे गेल्या वर्षी आरोग्य यंत्रणेसह प्रशासन देखील गडबडून गेले हाेते. परंतू प्रशासनाने या सर्व परिस्थितीवर चांगलेच नियंत्रण आणले होते. तरीही दुसऱ्या लाटेमध्ये मात्र प्रशासनाने लॉकडाऊन उघडले. सर्व व्यवहार खुले देखील केले होते. शहरी भागासह ग्रामीण भागातील कोविड सेंटर बंद देखील करण्यात आले होते. कंत्राटी कामगार, सेवक, परिचारीका, डॉक्टर यांच्या सेवा संपवण्यात आल्या त्यामुळे मार्च मध्ये दुसरी लाटेला खुप मोठया प्रमाणात रुग्ण वाढायला सुरुवात झाली.
आणी आता पुन्हा कोराेना रुग्ण संंख्या वाढीवर नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे आता मागच्या वर्षीच्या धडा घेवून प्रशासनाने आरोग्य तसेच विविध स्तरावर कोरोना रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कंबर कसुन कामाला लागलेले दिसून येत आहे. आता विलगीकरणासाठी शहरासह जिल्हाभरातील शाळा बघण्याचे काम खुप वेगाने सुरु करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र दिनानिमित्त बीडमध्ये विशेष लसीकरण; मात्र लसीसाठी नोंदणी आवश्यक
- व्हाट्सअपवर मटका चालविणाऱ्याविरोधात गुन्हा
- ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ; फोटो शेअर करत पंजाब किंग्जने घेतली बंगळुरुची फिरकी
- बीड जिल्हा रुग्णालयात १० व्हेंटिलेटरसह २० खाटांचा आयसीयू वॉर्ड होणार सुरु
- रेमडेसिवीर चोरी प्रकरणात मनपाचे दोन कर्मचारी निलंबित!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

