Share

योगींच्या उत्तर प्रदेशात मरणानंतरही हालच ; मृतदेह वेटिंग लिस्टवर, स्मशानभूमीत जागाच मिळेना !

Published On: 

आग्रा : देशामध्ये कोरोना रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. भारतात दररोज आता 3 लाखाहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. आतापर्यंत जगात इतके प्रकरण एका दिवसात आले नव्हते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज कोविडशी सामना करण्यासाठी काय काय करता येईल याबाबत बैठका घेत आहेत. दरम्यान, सोमवारी देशात कोविडची 3,52,991 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. यासह देशात संक्रमितांची संख्या 28,13,658 इतकी झाली आहे.

या महामारीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीतही जागा मिळत नसल्याचं भीषण वास्तव आता समोर आलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानात जागाही शिल्लक राहिलेली नाही. मृतदेहांवर अंत्यसंस्कार होण्यासाठी बरेच दिवस वाट पाहावी लागत आहे. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह हे वेटिंग लिस्टवर ठेवण्यात आले आहेत. आग्रा शहरातील लोकांवर आपल्या नातेवाईकांचे मृतदेह तब्बल 90 किलोमीटर दूर अलीगडमध्ये नेऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.

आग्रा शहरातील स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठीही तीन दिवस वाट पाहावी लागत आहे. याच दरम्यान लोको पायलट प्रेमपाल सिंह यांचे निधन झाले. त्यानंतर मुलाने त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र स्मशानभूमीत जागाच नसल्याने त्याने अलीगढमध्ये जाऊन वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी 90 किलोमीटरचा प्रवास केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर पार्किंगमधील जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!