Share

शाब्बास रे पठ्ठ्या ! ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सने भारताला केली तब्बल ५० हजार डॉलर्सची मदत !

Published On: 

नवी दिल्ली- राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. देशात आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत असून मागील लाटेपेक्षा यंदा स्थिती गंभीर झाली आहे. ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे.

कोरोनाच्या लाटेचा फटका क्रिकेटविश्वाला देखील बसला असून सध्या सुरु असणाऱ्या आयपीएलमधून काही खेळाडूंनी माघार देखील घ्यायला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि राजस्थान रॉयल्सचा (आरआर) वेगवान गोलंदाज एंड्रयू टायने भारतात वाढत्या कोरोनामुळे मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (आरसीबी) केन रिचर्डसन आणि अॅडम जंपा यांनीही वैयक्तिक कारणास्तव लीग सोडण्याचा निर्णय घेतला.

कोरोनामुळे क्रिकेटपटू आयपीएल अर्ध्यातून सोडून जात असतानाच याच आयपीएलमध्ये खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. पॅट कमिन्सने या कठीण काळात भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पॅट कमिन्स भारताला 50 हजार डॉलरची मदत करणार असल्याची घोषणा केली आहे.

आपल्या भावना व्यक्त करताना तो म्हणाला, भारतामध्ये मी गेली अनेक वर्ष येत आहे आणि इथल्या लोकांनी मला खूप प्रेम दिलं. एवढ्या जणांना त्रास होत असताना मलाही दु:ख होत आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असताना आयपीएल खेळवणं योग्य आहे का? असे प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत, पण लॉकडाऊनमध्ये असलेल्या असंख्य नागरिकांना या कठीण काळात थोडा तरी विरंगुळा मिळेल, या विचाराचं भारत सरकार असल्याचं मला सांगण्यात आलं.’

‘आयपीएलमुळे आम्हाला कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचता येतं, याचाच विचार करून मी पीएम केयर फंडाला आर्थिक मदत करायचं ठरवलं आहे. यामुळे भारताला गरज असलेले ऑक्सिजन सिलेंडर विकत घेता येतील. याचसोबत मी माझे सहकारी खेळाडू आणि इतरांनाही विनंती करतो की ज्यांना भारताकडून प्रेम मिळालं आहे, त्यांनीही मदत करावी. मी 50 हजार डॉलरची मदत करत आहे.’

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!