औरंगाबाद : शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यात मी जबाबदार मोहिमेच्या माध्यमातून संवाद दौरा सुरू असून या दौ-याच्या निमित्ताने शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांनी कन्नड तालुक्यात पिशोर येथे आढावा बैठक घेऊन ग्रामीण भागातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्या सोबतच नवीन व चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उभारण्यावर भर देण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासोबत आ.उदयसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच पिशोर येथील ग्रामपंचायतीच्या विलगीकरण कक्षास भेट देऊन पाहणी केली.
याच धर्तीवर वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन रुग्णांना वेळीच उपचार मिळावा यासाठी वैद्यकीय व प्रशासकीय अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली पिशोर येथे ५० बेडचे कोविड केअर कक्ष सुरू करण्यासंबंधी सूचना दिल्या व त्यासाठी पाहिजे ती मदत देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अवचित वळवळे तालुकाप्रमुख केतन काजे, वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत गावंडे, मनोज राठोड, डॉ.धीरज पाटील, पोलीस निरीक्षक व्ही.एम.आहेर, विभागप्रमुख विलास पवार, पि.एम.डहाके, उमेश मोकसे, बाळासाहेब जाधव, शाखाप्रमुख शंकर नवले आदी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे तालुक्यातील टापरगाव येथे काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णाची लक्षणीय वाढ झाल्याने आ.अंबादास दानवे यांनी रुग्णवाढीला आळा घालण्यासाठी वैद्यकीय व प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोरोना प्रतिबंधासाठी ठोस उपाययोजना संबंधी सूचना केल्या. यावेळी आ.उदयसिंह राजपूत, तालुकाप्रमुख केतन काजे, डॉ.हेमंत गावंडे, मनोज राठोड, दिलीप मुट्ठे, शरद शिरसाठ, सरपंच रुपाली मोहिते, उपसरपंच वैशाली तुपे, शाखाप्रमुख उमेश मोहिते आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- केंद्राने घोषणा केली ४० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची अन् दिले २६ हजारच; मंत्री शिंगणेंची माहिती
- ‘ठाकरे सरकारमधील नेते श्रेयासाठी हपापलेले, त्यामुळेच शिवसेना आणि काँग्रेसचे पित्त खवळले’
- महिलेचा छळ करणारा संजय राऊत हा विकृत माणूस, त्यांना अटक झालीच पाहिजे – निलेश राणे
- ‘रजनी सर म्हातारे होत आहेत म्हणून…’ जडेजाच्या कामगिरीनंतर धोनीचे ट्विट व्हायरल
- इशारा काय देता ? बदनामीचा खटला दाखल कराच; मुश्रीफांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

